Uncategorized

Khanapur Rain News: वादळी पावसाचा आणखी एक तडाखा

 झाडे उन्मळून पडली, ठिकाणी विजेचे खांब वाकलेत
विटा : गेल्या अनेक दिवसांपासून भीषण उष्णता आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या खानापूर तालुक्यातील नागरिकांना आज (७) दुपारी ४:०० च्या सुमारास झालेल्या वळीवाच्या पावसाने मोठा दिलासा दिला. विटा-लेंगरेसह घाटमाथा आणि जवळपास संपूर्ण खानापूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
विशेषतः घाटमाथ्यावरील गावांमध्ये पावसाचा जोर चांगला राहिल्याने वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे. पावसाचे आगमन जोरदार वादळी वाऱ्यासह झाले. या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विटा-नेवरी तसेच लेंगरे आणि परिसरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी विजेचे खांब वाकल्याच्या घटना घडल्या.
शेतकरी वर्गात या पावसामुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे. खरीप हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस ‘संजीवनी’ ठरणार आहे. या वळीव पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढणार असून, पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना आता चांगली गती मिळणार आहे.

Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​