Uncategorized

Kagal News | केनवडे ते पिंपळगाव… प्रवासाचा थरार की सरकारी अनास्था? तासनतास अडकलेत हजारो भाविक!

                    बाळूमामा दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा फटका

व्हनाळी (सागर लोहार)- कागल-निढोरी या राज्यमार्गावर सध्या सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. व्हनुर फाटा,केनवडे फाटा ते पिंपळगाव,भडगाव पाटी दरम्यान रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. याचा सर्वाधिक फटका श्री क्षेत्र आदमापूर (बाळूमामा) कडे जाणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक प्रवाशांना बसत असून, वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या या मार्गावर ठिकठिकाणी रस्ता उकरून ठेवण्यात आला आहे. खडीकरण आणि कच्च्या कामामुळे धुळीचे लोट उसळत असून, एकेरी वाहतुकीमुळे तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. केनवडे पासून ते पिंपळगाव भडगाव पाटीपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर झाला आहे. उन्हाचा तडाखा आणि त्यात होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांचे विशेषतः लहान मुले व वृद्धांचे हाल होत आहेत.

हा मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून आदमापूर येथील बाळूमामांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा मुख्य मार्ग आहे. सुट्टीचे दिवस किंवा आमावशा दिवशी या मार्गावर वाहनांची वर्दळ प्रचंड असते. मात्र, नियोजनाचा अभाव आणि वाहतुकीची कोणतीही दुसरी व्यवस्था नसताना सुरू असलेल्या कामामुळे भाविकांचा प्रवासाचा वेळ दुप्पट झाला आहे.

वाहतूक कोंडीची भीषणता लक्षात घेता, वाहनधारकांनी पर्यायी कागल निपाणी मुदाळतिट्टा, व कोल्हापूर – गारगोटी मार्गे बाळूमामा दर्शनासाठी प्रवास करण्याचे आव्हान केले आहे


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​