Uncategorized

Israel threat to Iran इराणवर हल्ल्याचा इस्रायलचा इशारा अमेरिकेसह आघात करणार, इराणला धडा देणार

► वृत्तसंस्था जेरुसलेम
इराणवर पुन्हा हल्ला करण्यासाठी इस्रायल सज्ज होत आहे. आम्ही इराणवर थेट हल्ला करणार असून तो मागच्या हल्ल्यापेक्षाही अधिक तीव्र आणि मोठा असेल, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ यांनी शुक्रवारी दिला. इराणला अणुबाँब निर्माण करु न देणे, हे आमचे ध्येय आहे. अमेरिकेचाही हाच निर्धार आहे. त्यामुळे आम्ही अमेरिकेसह इराणवर हल्ला करु, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी झालेली शस्त्रसंधी आता संपुष्टात आली आहे, अशी घोषणा बुधवारी केली. त्यानंतर गुरुवारी अमेरिकेने इराणवर मोठे हल्ले केले. इराणनेही प्रत्युत्तर दिले. त्यामुळे हा संघर्ष पुन्हा भडकला आहे.

आता या संघर्षात उडी घेण्यास इस्रायलही सज्ज झाल्याने इराण काय करणार, याकडे पाहिले जात आहे. इराणवर आपले वायुवर्चस्व राखण्यासाठी इस्रायलला हल्ला करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे वक्तव्य यिस्रायल कात्झ यांनी केले.

हेही वाचा :FSSI Notice to Alcohol Companies रम, ब्रँडी, व्हिस्की पिताय? सावधान! FSSI ची मद्य कंपन्यांना नोटीस

दुबळा झाला आहे इराण
इस्रायलने इराणवर यापूर्वी दोनदा मोठे हल्ले केले आहेत. त्यामुळे इराण आता दुबळा झाला आहे. त्याची संघर्ष करण्याची शक्ती कमी झाली आहे. मात्र, ती पूर्णत: नाहीशी झालेली नाही. परिणामी, इराणशी असणारा संघर्ष अद्याप संपलेला नाही. इराणची शक्ती पुरती संपल्याशिवाय आम्हाला स्वस्थ बसता येणार नाही. त्यामुळे आमचे वायुदल आणि भूदल सज्ज आहे, अशी माहिती कात्झ यांनी दिली.

इस्रायलचे वायुदल समर्थ
इराणमध्ये कोठेही स्वबळावर हल्ला करण्यासाठी इस्रायलचे वायुदल सक्षम आहे. आमची युद्धविमाने येमेनपर्यंतही पोहचू शकतात. आम्ही वायुदलाला सज्ज राहण्याचा आदेश दिलेला आहे. केव्हाही आम्ही इराणवर हल्ला करू शकतो. इराण हा देश विश्वास ठेवण्यास पात्र नाही. त्याच्यावर सतत हल्ले केले करत राहणे आवश्यक आहे. त्याला थोडी जरी उसंत मिळाल्यास तो पुन्हा युद्धासाठी सज्ज होण्याचा प्रयत्न करु लागतो. त्याचा प्रयत्न काहीही करून अणुबाँब बनविण्याचा आहे. इराणकडे अणुबाँब असणे, हे इस्रायलसाठी सर्वाधिक धोकादायक आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत सजग आणि सतर्क आहोत, अशी मांडणी त्यांनी केली.
बॉक्स
नजीकच्या भूतकाळात दोन हल्ले
28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर जोरदार बाँब हल्ले केले होते. हे हल्ले प्रामुख्याने इराणच्या राजकीय नेतृत्वाच्या विरोधात होते. त्या हल्ल्यात इराणचे प्रमुख धार्मिक नेते आयातोल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. तसेच इराणचे अनेक नेते आणि अधिकारीही मारले गेले होते. त्यानंतर जून 2025 मध्ये इस्रायलने इराणवर हल्ले केले होते. ते युद्ध सलग 12 दिवस चालले होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​