Gokul Election 2026| गोकुळच्या 427 संस्था अपात्र प्रकरणाला नवे वळण; आज कोर्टात तातडीची सुनावणी

कोल्हापूर : ४२७ दूध संस्था अपात्रप्रकरणी आमदार सतेज पाटील यांच्या वतीने ४ दूध संस्थांकडून दाखल झालेल्या याचिकेवर आज सर्किट बेंचमध्ये तातडीची सुनावणी आहे. याचिका दाखल झाल्या झाल्या त्याच रात्री ४२७ पैकी २७० संस्था पात्र केल्या गेल्या, त्यामुळे आता या सुनावणीत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गोकुळ दूध संघातील ४२७ दूध संस्था अपात्र असल्याचा निर्णय विभागीय दुग्ध निबंधक राजकुमार पाटील यांनी निर्णय दिला होता, तथापि कोणत्याही नोटीसीविनाआणि चौकशीविना एकतर्फी निर्णय दिला म्हणून जिल्हयातील संस्थांनी न्यायालयात धाव घेतली.
यात जय जवान जय किसान दूध संस्था, खेबवडे ता. करवीर, कौलव महिला सहकारी दूध संस्था, कौलव, ता. राधानगराह कै दिनकराव आ कवडे दूध संस्था,आवळी बुद्रुक, (ता. राधानगरी), सुरभी सहकारी दूध संस्था मौजे वडगाव (ता. हातकलंगले) हे याचिकाकर्ते आहेत. ४२७ दूध संस्थाना कोणतीही पूर्वसूचना न देता मतदानापासून वंचित ठेवण्याचा हेतु होता. या संस्थांना आतापर्यंत ठराव मागणीचे पत्र मिळालेले नाही.
म्हणून ४ दूध संस्थांच्या नावे सुट्टीचे कोर्ट असल्यामुळे पिटिशन दाखल करण्यासाठी परवानगी मागितली असता कोर्टाने पिटिशन दाखल करण्याची परवानगी दिली. या संस्थांच्या वतीने अॅड. श्रीकृष्ण गणबावले काम पाहत आहेत. विशेष म्हणजे ज्या संस्थानी याचिका दाखल केली आहे. त्या २७० संस्था पात्रच्या यादीत आहेत.
Source link



