Uncategorized

Generating electricity from saltwater and wastewater in Japan

जपानने पुकुओकामध्ये स्वत:चा पहिला ऑस्मोटिक ऊर्जाप्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प खाऱ्या पाण्याला प्रक्रियाकृत सांडपाण्यासोबत मिसळून वीज निर्माण करतो. जगातील अशप्राकारचा हा दुसरा वीजप्रकल्प असून त्यातून दरवर्षी जवळपास 8 लाख 80 हजार किलोवॅट वीज निर्माळा होण्याची अपेक्षा आहे. विजेचे हे प्रमाण शहर आणि आसपासच्या क्षेत्रांना पेयजल उपलब्ध करविणारा प्रकल्प संचालित करण्यासाठी पुरेसे आहे.

या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज जवळपास 220 जपानी घरांना वीज पुरवू शकते. हे एक उदयोन्मुख तंत्रज्ञान असून याचा वापर सध्या केवळ मर्यादित स्तरावर होत आहे. परंतु यात काही अन्य नुतनीकरणीय ऊर्जांच्या तुलनेत हे केवळ हवा आणि अनय घटकांची पर्वा न करता चोवीस तास उपलब्ध आहे. ही प्रणाली ताज्या अन् खाऱ्या पाण्याच्या मिश्रणावर आधारित असून ज्यामुळे ऊर्जेचा प्रवाह दिवसरात्र जारी राहू शकतो आणि विजेचा एक स्थिर स्रोत प्राप्त होतो.

पुकुओआ प्रकल्प जगात अशाप्रकारचा दुसरा प्रकल्प आहे. पहिला प्रकल्प 2023 मध्ये डेन्मार्कच्या मारियागरमध्ये सॉल्टपॉवर या कंपनीकडून स्थापन करण्यात आला होता. जपानचा वीज प्रकल्प डेन्मार्कमधील प्रकल्पापेक्षा मोठा आहे. परंतु दोघांची संचालन क्षमता जवळपास समान आहे. नॉर्वे आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशांमध्येही प्रायोगिक स्तरावर याचा वापर सुरू आहे.

जपानी प्रकल्प ऑस्मोटिक ऊर्जेसाठी एक रोमांचक क्षण आहे, कारण हा या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर ऊर्जा उत्पादनासाठी केला जाऊ शकतो याचा पुरावा प्रदान करतो. सरकारी वित्तसहाय्य प्राप्त झाल्यास अन्यत्रही अशाप्रकारचे प्रकल्प उभारले जाऊ शकतात. भारतातही खारे पाणी अन् सांडपाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने अशाप्रकारचा वीजनिर्मिती प्रकल्प उभारून स्वत:ची गरज पूर्ण करता येणार आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​