Uncategorized

FSSAI Notice to Swiggy Instamart: खराब अन्न आणि एक्सपायर्ड प्रॉडक्ट्स विकल्याप्रकरणी स्विगी इन्स्टामार्ट अडचणीत

मुंबई – गेल्या काही दिवसांपासुन राज्यात IAS तुकाराम मुंढे यांच्याकडून भेसळखोरांविरोधात धुमधडाका सुरु आहे.. भेसळखोरांविरोधात अनेक ठिकाणी कारवाई देखील केली आहे.. तुकाराम मुंढे यांच्याकडून भेसळखोरांविरोधात कारवाईचाधडाका सुरू असतानाच, आता देशातील सर्वोच्च अन्न नियामक संस्था FSSAI देखील अॅक्शन मोडवर पहायला मिळत आहे. FSSAI ने खराब अन्न विकल्याप्रकरणी ‘स्विी इन्स्टामार्ट’ला 9 नोटिसा पाठवल्या आहेत. FSSAI च्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.यामुळे स्विगी इन्स्टामार्ट’चं टेंशन चांगलेच वाढल्याचे चित्र दिसत आहे. ..

काय आहे प्रकरण ?

गेल्या अनेक दिवसांपासुन ग्राहकांनी ‘स्विगी इन्स्टामार्टमधुन अन्न येत असल्याच्या तक्रारी येत होत्या.. इन्स्टामार्टद्वारे ग्राहकांना मुदत संपलेली अंडी, सडलेले अन्न, दुर्गंधीयुक्त प्रथिने आणि अगदी लहान मुलांचे असुरक्षित दुधाचे अन्नपदार्थ पुरवण्यात आले आहे, असा गंभीर आरोप करण्यात आले होते..ग्राहकांनी अनेकदा खराब अन्नाबाबत तक्रार केली होती. परंतु कंपनीने मूळ समस्येकडे दुर्लक्ष केले. त्यांनी केवळ पैशांचा परतावा देऊन वेळ मारून नेली.

आता तसेच एकदा परत आलेले खराब उत्पादन दुसऱ्या ग्राहकाला पाठवल्याचाही आरोप आहे.आता यावर FSSAIने स्विगी इन्स्टामार्टवर कारवाईचा बडका उठवला आहे.. ग्राहकांच्या या आरोंपावर FSSAIने स्विगी इन्स्टामार्टला लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे..

मागील महिनाभरापासून आयएएस तुकाराम मुंढे यांच्याकडून अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.आता FSSAI कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणादणले आहेत.. FSSAI आता आणखी कुणावर कारवाई केली जाते, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​