Uncategorized

नेपाळ पुरामधील बळींचा आकडा 1365 वर

बेपत्ता लोकांच्या शोधासाठी नातेवाईकांचे प्रयत्न

  वृत्तसंस्था, काठमांडू

नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी आलेल्या विध्वंसयक पूराचे चित्र आता आणखी भयावह झाले आहे. विविध प्रभावित भागांमधून आणखी मृतदेह मिळाल्याने बळींचा आकडा वाढून 1,365 झाला आहे, तर 5,326 लोक अद्याप बेपत्ता असून यातील कमीतकमी 589 विदेशी नागरिक असल्याचे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले आहे. तर मदत अन् बचाव अभियानाला अनेक दिवस उलटूनही हजारो परिवारांना अद्याप स्वकीयांच्या शोधाची प्रतीक्षा आहे.

नेपाळ पोलिसांनुसार सर्वाधिक 363 मृतदेह चितवन येथून हस्तगत करण्यात आले आहेत. तर पूर्व नवलपरासी येथून 226, पश्चिम नवलपरासी येथून 222 आणि नुवाकोट येथे 197 मृतदेह हाती लागले आहेत. यानंतर रसुवामध्ये 174, गोरखामध्ये 75, धादिंगमध्ये 70 आणि तनहूंमध्ये 38 मृतदेह हस्तगत करण्यात आले. ओळख प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आतापर्यंत 102 मृतदेह परिवारांना सोपविण्यात आले आहेत.

डीएनए नमुने

अनेक मृतदेहांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. सुरक्षा दलांनी 1,147 अनोळखी मृतदेहांचे डीएनए नमुने प्राप्त करत ओळख पटल्यावर ते त्यांच्या परिवारांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाऊल उचलले आहे.

26 ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेनजीक ग्लेशियर अचानक तुटल्याने भोटेकाशी अणि त्रिशूली नदीत पूर आला होता. भोटकोशी नदीच्या पुराने अनेक गावं, बाजारपेठा आणि रस्ते वाहून नेले होते. अद्याप अनेक गावांमध्ये बचाव अन् शोध कार्य सुरु असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​