Uncategorized

तेंडोली-गावठणवाडीतील महापुरुष मंडळाकडून शाळेला कपाट भेट

शहर वार्ताहर/कुडाळ : तेंडोली-गावठणवाडी येथील महापुरुष क्रिकेट संघ व श्री देव महापुरुष मित्रमंडळा च्यावतीने सातत्याने सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. याच परंपरेला पुढे नेत महापुरुष चषक तेंडोली 2026 या क्रिकेट स्पर्धेतील शिल्लक रकमेतून तेंडोली-गावठणवाडी येथील जि. प. प्रा. शाळेला कपाट भेट देण्यात आले.
शाळेतील फाईल्स, महत्त्वाची कागदपत्रे तसेच अन्य शैक्षणिक दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी कपाटाची कमतरता भासत होती. काही कागदपत्रांना वाळवी लागून त्यांचे नुकसानही झाले होते. शाळेची ही गरज ओळखून सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने कपाट भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका रिया राजेश परब यांच्याकडे सदर कपाट सुपूर्त करण्यात आले. यावेळी त्यांनी मंडळाच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करीत आभार मानले. याप्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते गणेश गुरव, रोहित खानोलकर, गौरव घाडी, वेदांत साळसकर, श्रीकांत गुरव, हर्ष नाईक, तेजस चव्हाण, हर्ष गुरव व हर्षल गुरव उपस्थित होते. “समाजासाठी हातभार, शिक्षणासाठी आधार” या प्रेरणादायी भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे समाजात शिक्षणाबद्दलची जाणीव व सामाजिक उत्तरदायित्व अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​