Uncategorized

केसरीत भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न

सावंतवाडी प्रतिनिधी : घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या वतीने केसरी येथील ग्लोबल एक्वेरियम येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. त्यामध्ये डॉ. दत्तात्रय सावंत (बालरोगतज्ज्ञ), डॉ. सतीश सावंत (जनरल फिजिशियन), डॉ. विनय सूर्यवंशी (दंतचिकित्सक), डॉ. अभिजीत चितारी (हृदयरोगतज्ज्ञ), डॉ. नेहा सावंत (नेत्ररोगतज्ज्ञ), डॉ. अवधूत निखिल (अस्थिरोगतज्ज्ञ), डॉ. विनोद कांगुले (भूलतज्ज्ञ) तसेच डॉ. माधवी कशाळीकर यांनी सेवा दिली. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती हे या आरोग्य शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात ग्लोबल एक्वेरियमचे व्यवस्थापक रमेश राऊळ यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे हे आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. रक्त तपासणीसाठी जिल्हा उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथील सेजल आयरेकर, सिंथिया तसेच त्यांच्या संपूर्ण पथकाने मोलाचे सहकार्य केले. याबद्दल घे भरारी फाउंडेशनच्या वतीने जिल्हा उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी तसेच ग्लोबल एक्वेरियम, केसरी यांचे विशेष आभार मानण्यात आले. या आरोग्य शिबिराचा माडखोल, केसरी, ओवळीये, देवसू, पारपोली, सावंतवाडी, धवडकी आदी परिसरांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

यावेळी घे भरारी फाउंडेशनच्या संस्थापिका मोहिनी मडगावकर, अध्यक्ष, उपाध्यक्षा मेघना राऊळ, कार्याध्यक्षा रिया रेडीज, सचिव मेघा दुबळे, खजिनदार मेघना साळगावकर तसेच गीता सावंत, संध्या पवार, मनीषा नवांगुळ, स्वप्नाली कारेकर, मनीषा मिशाळ, रेखा कुमटेकर, अरुणा नाईक, दीपा नेवगी, सीमा रेडीज आणि अन्य सभासद उपस्थित होत्या.

घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडीच्या वतीने समाजोपयोगी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. या कार्याबद्दल समाजातील सर्व स्तरांतून फाउंडेशनचे कौतुक होत आहे. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत नागरिकांची आरोग्य तपासणी झाल्याने ग्रामस्थांना या शिबिराचा मोठा लाभ झाला. याबद्दल उपस्थित नागरिकांनी घे भरारी फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​