Uncategorized
सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती मोहनतारा देसाई यांचे निधन

सावंतवाडी शहर वार्ताहर : शहरातील सालईवाडा येथील रहिवासी व सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती मोहनतारा मनोहर देसाई (91) यांचे 20 जुलै रोजी वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले. काही वर्षापासून त्या पुणे येथील आपल्या मुलांकडे राहत होत्या. मनमिळाऊ व शांत स्वभाव होता. शिस्तप्रिय शिक्षका म्हणून त्यांची ओळख होती. पुणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात दोन मुलगे, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आनंद, नंदकिशोर, नंदा व सविता यांच्या त्या मातोश्री होय.
Source link



