Uncategorized

UP Crime दीड वर्षीय भाच्याचा जीव घेणाऱ्याला फाशी 40 दिवसांत न्यायालयाचा निकाल

► वृत्तसंस्था फिरोजाबाद
उत्तर प्रदेशातील शिकोहाबाद येथे 30 मे रोजी दीड वर्षाच्या आरव नामक भाच्याला जमिनीवर फेकून केलेल्या निर्घृण हत्येप्रकरणी खुन्याला जिल्हा न्यायाधीशांनी शुक्रवारी शिक्षा सुनावली. त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अवघ्या 40 दिवसांत दिलेल्या या निर्णयाने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

न्यायालयाने खुनी विराज उर्फ जितेंद्र पाठक याला दोषी ठरवले आहे. आरवला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या दृश्dयात तो मुलाला आठ वेळा फेकताना दिसत होता. घटनेनंतर त्याच दिवशी सहा तासांनंतर पोलिसांनी विराजला अटक करून तुरुंगात पाठवले होते.

तपासादरम्यान सहा दिवसांत, शिकोहाबाद पोलिसांनी सर्व 13 साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायाधीश डॉ. बब्बू सारंग यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू झाली. न्यायालयाने जलदगतीने सुनावणी घेऊन गुरुवारी दुपारी त्याला दोषी ठरवले.

त्यानंतर शुक्रवारी दुपारी शिक्षेची घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी संतोष शर्मा आणि एसएसपी आदित्य लगैन यांनी जलदगतीने सुनावणी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर न्यायालयानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले. या प्रकरणात मृत्यूदंडाशिवाय दुसरी कोणतीही शिक्षा असू शकत नाही, असे न्यायालयाने निवाडा देताना स्पष्ट केले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​