Robbery at gst Officers home रात्रभर छतावर लपून बसले अन् जीएसटी अधिकाऱ्याच्या कुटुंबियांना डांबून केली सोन्यासह पैशाची लूट

सहाय्यक जीएसटी आयुक्तांच्या कुटूंबाला बंदुकीने धाकाने ओलीस ठेवत शस्त्रधारी चोरांनी लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानातील अलवर येथून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी तब्बल दीड तास अधिकाऱ्यांच्या कुटूंबाला दोरीने बांधुन ठेवले आणि १५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.
समोर आलेल्या माहितीनुसार शालीमार नगर येथे जीएसटी विभागातील सहायक आयुक्त ओम प्रकाश यांच्या निवासस्थानी हा दरोडा पडला. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दरोडेखोर शुक्रवारी रात्री उशिरा छतावर चढले आणि रात्रभर लपून राहिले असावेत असा संशय आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले, “शनिवारी सकाळी सुमारे ६ वाजता, जेव्हा कुटुंबाने छताचे गेट उघडले, तेव्हा ते तिघे जण बंदुकीचा धाक दाखवून घरात घुसले.”
कुटुंबियांना बंंदुकीचा धाक दाखवला
“दरोडेखोरांनी ओम प्रकाश, त्यांची पत्नी आणि मुलांना ताब्यात घेतले, कुटुंबातील चार सदस्यांना बांधून त्यांच्या तोंडाला पट्टी बांधली आणि त्यांनी प्रतिकार केल्यावर त्यांना मारहाण केली. कुटुंबाने सहकार्य न केल्यास त्यांना ठार मारण्याची आणि अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार करण्याची धमकी दरोडेखोरांनी दिली,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
दरोडेखोरांनी घरात नासधूस करण्यापूर्वी ओम प्रकाश यांच्या कुटूंबातील महिलेला तिचे दागिने काढण्यास भाग पाडले, असा आरोप आहे. “ते सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने, रोकड आणि अनेक लाख रुपयांच्या इतर मौल्यवान वस्तू घेऊन पसार झाले,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, पळून जाण्यापूर्वी त्यांनी कुटुंबाला पोलिसांना माहिती न देण्याची धमकी दिली होती, अशीही माहिती समोर आली आहे.
Source link



