Uncategorized

वर्ल्ड नेमबाजी स्पर्धेत भारत अव्वल स्थानी

वृत्तसंस्था/ चेन्नई

जर्मनी येथे झालेल्या ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची दमदार कामगिरी करत भारताने एकूण 24 पदके पटकावले यामध्ये (सात सुवर्ण, आठ रौप्य आणि नऊ कांस्य) जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. भारताच्या मागे ‘इंडिव्हिज्युअल न्यूट्रल अॅथलीट्स‘ हिले, ज्यांनी सहा सुवर्णपदकांसह एकूण 14 पदके जिंकली तर इटलीसारख्या बलाढ्या संघाने सहा सुवर्णपदकांसह एकूण 10 पदके मिळवून तिसरे स्थान गाठले.

पिस्तूल आणि रायफल प्रकारांमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांनी या स्पर्धेचा शानदार समारोप केला जरी ‘शॉटगन‘ प्रकारात भारताला कोणतेही पदक मिळाले नाही, तरीही एकूण 24 पदके जिंकून भारत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिला.या स्पर्धेत सेजल कांबळेने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले, तर हिमांशीने कांस्यपदक मिळवले. तिसऱ्या भारतीय स्पर्धकाला, वंशिका चौधरीला, मात्र एका विचित्र प्रसंगाचा सामना करावा लागला; सुवर्णपदक आणि संभाव्य ज्युनियर जागतिक विक्रम जिंकण्याच्या शर्यतीत असताना अंतिम क्षणी गोंधळामुळे तिला तिचा शेवटचा शॉट फायर करता आला नाही.

भारताचे पदकविजेते नेमबाज : 10 मीटर एअर पिस्तूल महिला ज्युनियर संघ – सेजल कांबळे व वंशिका चौधरी, नव्या बिश्नोई -सुवर्ण, 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स महिला ज्युनियर -प्राची गायकवाड- रौप्य, 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल पुरुष ज्युनियर – समीर-सुवर्ण, 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स पुरुष ज्युनियर संघ -रोहित कन्यान, वेदांत नितीन वाघमारे, हितेश श्रीनिवासन-कांस्य, 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल पुरुष ज्युनियर संघ-समीर,अभिनव चौधरी,साहिल चौधरी कांस्य, 10 मीटर एअर रायफल महिला ज्युनियर – अन्वी राठोड कांस्य, 10 मीटर एअर रायफल पुरुष ज्युनियर – प्रीतम केंद्रे सुवर्ण, 25 मीटर पिस्तूल महिला ज्युनियर संघ-अंजली भागवत, परिषा गुप्ता, निथिला आयव्ही डार्लिंग प्रवीण ख्रिस्तोफर कांस्य, 25 मीटर पिस्तूल पुरुष ज्युनियर संघ – अभिनव चौधरी, राज चंद्र, जतिन कांस्य, 10 मीटर एअर पिस्तूल पुरुष ज्युनियर – शिवा नरवाल, संदीप. बिश्नोई, चिराग शर्मा रौप्य, युग प्रताप सिंग राठोड कांस्य, 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक ज्युनियर वंशिका चौधरी, शिवा नरवाल रौप्य, 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल पुरुष ज्युनियर- अभिनव देशवाल,जतिन, अभिनव चौधरी-रौप्य, शौर्य कांस्य, 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल महिला स्टँडर्ड पिस्तुल पी. रिया दुग्गल कांस्य, 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक ज्युनियर शांभवी क्षीरसागर, अभिनव सुवर्ण, 50 मीटर पिस्तूल पुरुष ज्युनियर राज चंद्र कांस्य, 50 मीटर पिस्तूल पुरुष ज्युनियर सांघिक योगेश कुमार, प्रतीक, अभिनव चौधरी रौप्य, 50 मीटर पिस्तूल  महिला ज्युनियर ऐश्वर्या बेलोहोसूर रौप्य.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​