रिषभ पंत, कुलदीप यादव पुन्हा स्वगृही

वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत सर्वात महागडा ठरलेला फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत तसेच फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांचे स्वगृही पुनरागमन झाले आहे.
2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रिषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत होता तर दिल्ली कॅपिटल्सकडून फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आपला सहभाग दर्शविला होता. पण आता पंत पुन्हा दिल्ली कॅपिटल्स संघात तर कुलदीप यादव पुन्हा आपल्या पूर्वीच्या लखनौ सुपर जायंट्समध्ये दाखल झाले आहेत. मात्र पंतच्या मानधनात खूपच घट झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने पंतला आता 15 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे तर कुलदीप यादवला लखनौने 13.50 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे. पंतने यापूर्वी आयपीएलच्या इतिहासात 2016 ते 2024 या कालावधीत 9 हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून 111 सामने खेळले आहेत. 2025 च्या आयपीएल क्रिकेटपटूंच्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने पंतला 27 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. तसेच फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने पुन्हा आपल्या पूर्वीच्या लखनौ सुपर जायंट्स संघात पुनरागमन केले आहे. मात्र त्याच्या मानधनात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Source link



