संगणकीय त्रुटी दूर करून आचऱ्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी द्या

आचरा रामेश्वर संस्थान समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
आचरा : प्रतिनिधी
महाराष्ट्रात शासनाने जाहीर केलेल्या बहुउद्देशीय ॲग्रोस्टॅक फार्मर आय डी योजनेअंतर्गत नोंदणी करण्यास गेलेल्या आचरा येथील कुळवहीवाटदार शेतकऱ्यांना संगणक प्रणालीतील त्रुटी मुळे फार्मर आयडी नोंदणी न करताच सेवा केंद्रावरून माघारी परतावे लागत आहे. आचरा गावातील अशा हजारो शेतकरी बांधवांस केवळ संगणकीय त्रुटी मुळे शासनाच्या असंख्य कृषी योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरेच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन सदर विषयी चर्चा करून संगणकीय त्रुटी दुरु करून आचऱ्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी द्यावा अशी मागणी संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी इनामदार रामेश्वर संस्थान कसबा आचरे विश्वस्त संजय मिराशी, अध्यक्ष श्री प्रदीप प्रभूमिराशी, उपाध्यक्ष श्रेयांस कानविंदे, सचिव श्री संतोष मिराशी व कोषाध्यक्ष श्री कपिल गुरव उपस्थित होते.
Source link



