Kolhapur | सांगली-कोल्हापूर मार्गावर मजले हद्दीत भीषण अपघात; कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर!

हातकणंगले : भरधावकारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या एकाचा मृत्यू झाला तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. शामलाल महिपती चौरे (वय ५६, मूळ रा. बालब्हे, जि. धुळे, सध्या रा. जयसिंगपूर) असे मृताचे तर दुचाकी चालक बिभीषण धोंडीबा लाटे (वय ४६, रा. संभाजीपूर, ता. शिरोळ) हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सांगली-कोल्हापूर मार्गावर मजले गावच्या हद्दीत घडला.
याबाबत आधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री सब्बा आठच्या सुमारास फिर्यादी बिभीषण लाटे हे आपल्या दुचाकीवरून सांगली-कोल्हापूर मार्गावरून जात होते. मजले गावच्या हद्दीतील हॉटेल अंबरसमोर आले असता, त्यांनी रस्त्या ओलांडण्यासाठी आपल्या दुचाकीचे उजव्या बाजूचे इंडिकेटर लावून गाडी डिव्हायडरच्या कडेला घेतली.
याचवेळी सांगलीकडून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव बेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये शामलाल चौरे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर हातकणंगले पोलीस ठाण्यात कार चालक प्रथमेश फाळके (वय २६, रा. कसबा बाबडा, ठोंबरे गल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रियांका बाकळे आधिक तपास करीत आहेत.
Source link



