Uncategorized

केएलईच्या ‘वचनोत्सव’मध्ये बसवेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर

1 हजारहून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांकडून 35 वचनांचे सामूहिक गायन

बेळगाव : काहेरच्या कन्नड विभाग व केएलई स्कूल ऑफ म्युझिक यांच्या संयुक्त विद्यमाने जे. एन. मेडिकल कॉलेज पॅम्पसमध्ये आयोजित ‘वचनोत्सव-2026’ कार्यक्रम  उत्साहात पार पडला. जगद्ज्योती बसवेश्वर महाराज यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि वचन साहित्यातील समानता, श्र्रमाची प्रतिष्ठा, कऊणा व सामाजिक न्याय या मूल्यांचा प्रसार करणे हा या उपक्रमामागील उद्देश होता.

या कार्यक्रमात केएलईच्या विविध संस्थांमधील 1 हजाराहून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. या अनोख्या सामूहिक गायन कार्यक्रमात 35 वचनांचे सादरीकरण केले. यावेळी डॉ. बसव माऊळसिद्ध स्वामीजी यांनी जगद्ज्योती बसवेश्वर महाराज यांची शिकवण आजच्या पिढीला सांगणे आवश्यक आहे. समता, बंधुभाव व सामाजिक समरसतेला चालना देणारे अनुभव मंटप हे जगातील अग्रगण्य लोकशाही व्यासपीठ होते, असे सांगत त्यांनी बसवेश्वर महाराज यांच्या विचारांचे महत्त्व विषद केले.

केएलई अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे यांनी नैतिकता आणि मूल्याधिष्ठित जीवन घडविण्यात वचन साहित्याची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगत वचनोत्सवात सहभागी झालेल्या केएलई परिवाराच्या उत्साही सहभागाचे त्यांनी विशेष कौतुक केले. विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. राजेश पवार, डॉ. अविनाश कवी यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. नेत्रावती कावी, अनुपमा यांनी तर डॉ. सुनीता पाटील यांनी आभार मानले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​