Uncategorized

पेरणीची घाई नको! कृषी विभागाचा इशारा

 

कोल्हापूर -सध्या पडणारा पाऊस मान्सूनचा नव्हे तर पूर्व मोसमी आहे, पेरणीची अजिबात घाई करू नका, असे कृषी विभागाने घसा ओरडून सांगितले तरी पेरण्यांसाठी धांदल उडाल्याचे चित्र सोमवारी सर्वत्र दिसले. दिवस उगवायला शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्र गाठल्याने सकाळी ९ वाजताच शेती सेवा केंद्रे शेतकऱ्यांच्या गर्दनि भरून गेलेली दिसत होती. दरम्यान, दुपारनंतर पावसाचे बाताबरण निवळले तरी खरेदीसाठीची गर्दी कायम होती. पण पेरणीसाठी अतिउत्साह दाखवल्यास तो महागात पडण्याचाइशारा कृषी विभागाने दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे.

विजांच्या कडकडाटासह दुपारनंतरजिल्ह्यात मागणीएवढे बियाणे उपलब्ध आहे, टंचाई अजिबात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी अनावश्यक बियाणे खरेदी टाळावी. अजून पेरणीचा हंगाम सुरू झालेला नाही, त्यामुळे पेरणी करून पश्चातापाशिवाय पदरात काही पडणार नाही, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.

जालंदर पांगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूरपाऊस झोडपून काढत मशागतीची असल्याने शेतीच्या सोपी झाली कामे आहेत.मशागतीकरता योग्य पाऊस असला, घाईघाईने पेरणी केली तर उगवणीबर परिणाम होणार आहे. त्यातच १५ जूननंतर पाऊस सक्रीय होणार आहे, तत्पूर्वी पुन्हा उष्मा वाढणार असल्याने आता आहे ती जमिनीतील ओलही कमी होणार आहे.

ही शिवारातील वस्तुस्थिती माहित असताना देखील शेतकऱ्यांनी शेती सेवा केंद्रासमोर खरेदीसाठी रांगा लावल्याचे चित्र सोमवारी सर्वत्र दिसत होते. बियाणे विक्रेत्यांनीही ही संधी साधून स्टॉल लावून बियाण्यांची विक्री सुरू केली. यावर्षी बियाण्यांच्या दरातही किलोमागे ३० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक भाडे वाढल्याचा परिणाम म्हणून बियाण्यांच्या विक्री दरातही वाढ दिसत आहे. महागडे बियाणे खरेदी केले आणि ते योग्यवेळी पेरले गेले नाही तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​