Uncategorized

Maharashtra Monsoon Update | मान्सून सुसाट! कोल्हापूर, सांगलीसह सोलापूरमध्ये आगमन; लवकरच मुंबई-पुण्यात धडकणार

    

कोल्हापूर – नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली तसेच सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. येत्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात आणखी पुढे सरकणार असून, लवकरच तो पुणे-मुंबई गाठण्याची शक्यता आहे. हर्णे, सोलापूर, कलबुर्गी, नंदयाल, चेन्नई, कैलाश शहर, लामडिंग, लखीमपूर अशी मान्सूनची रेषा आहे.

मान्सूनने सोमवारी पश्चिम शाखेने उत्तर कर्नाटकचा बहुतांश भाग, तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग व्यापत तेलंगणामध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात मान्सूनने गती पकडली आहे..पुढील दोन महाराष्ट्रात दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट आहे. त्यानंतर मात्र काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याने मान्सूनला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उत्तर, मध्य भारतात पुन्हा उष्णतेची लाट
उत्तर तसेच मध्य भारतात पुन्हा उष्णतेची लाट पसरली आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा तसेच विदर्भात देखील कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. ११ जूनपर्यंत राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसेच विदर्भात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​