Uncategorized

सेनापती कापशीतील ५० वर्षे जुना जॅकवेल कोसळला, अन्…..

 

सेनापती कापशी –गेली अनेक वर्ष कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावासाठी अखेर पर्यंत पिण्याच्या पाण्याची पूर्तता करणारा चिकोत्रा नदीवरील जॅकवेल गुरुवारी रात्री अचानक कोसळला. जॅकवेल कोसळल्याने विद्युत पंप जॅकवेल मध्येच अडकले आहेत. दुसऱ्या जॅकवेलची अगोदरच व्यवस्था केल्याने गावाचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घेतली गेली आहे.

१९७२ च्या दरम्यान चिकोत्रा नदीकाठी आखीव रेखीव दगडामध्ये बांधण्यात आले होते. मात्र हे जॅकवेल सातत्याने नदीतील पाण्याच्या प्रवाहामुळे कमकुवत बनले होते. नदीच्या पात्रा खालून भरपूर मातीच असल्यामुळे या जॅकवेलला भगदाड पडले होते. तरीसुद्धा या जॅकवेलमधून पाणीपुरवठा सुरू होता. हे जॅकवेल कधीही कोसळणार याची ग्रामपंचायतीला कल्पना असल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून येथे नव्याने आरसीसीमध्ये जॅकवेल बांधण्यात आले आहे. सध्या दोन्ही जॅकवेल मधून गावाला पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली आहे. त्यामुळे हे जुने जॅकवेल जरी कोसळले असले तरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ताबडतोब करण्याच्या हालचाली शुक्रवारी सकाळपासूनच सुरू झाल्या आहेत.

दरम्यान चिकोत्रा धरणातून पिण्यासाठीचे म्हणून पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा प्रवाह सुरू आहे. गुरुवारी रात्री सदरचे पाणी जॅकवेल जवळ आले असता आधीच कमकुवत झालेल्या जॅकवेलची भिंत या पाण्याच्या प्रवाहात गडप झाल्याचा अंदाज आहे. जॅकवेल दिसायचेच बंद झाले. जॅकवेल वरील आरसीसी छत अर्ध चंद्राकार कृतीत दिसत आहे. यावरूनच येथे जॅकवेल होते, याची कल्पना येते. शुक्रवारी सकाळी जॅकवेल कोसळल्याची घटना ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना समजली. त्यांनी ताबडतोब सरपंच, उपसरपंच, सदस्य व संबंधितांना दिली. सकाळी असंख्य ग्रामस्थ घटनास्थळी पाहण्यासाठी आले होते.

गावचा पाणीपुरवठा खंडित होऊ नये म्हणून ताबडतोब यंत्रणा कामाला लावली. जुन्या कोसळलेल्या जॅकवेलमध्ये १५ एचपी च्या दोन मोटरी गडप झाल्या आहेत. त्या सुद्धा काढण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली आहे. जॅकवेल कोसळल्याने विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्या तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मात्र वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे. हे जॅकवेल अतिशय जुन्या पद्धतीच्या दगडी बांधकामात केले होते. येथिल पुलावरून या जॅकवेलची भव्यता दिसत होती. मात्र ते कोसळल्याने काहीतरी येते हरवल्याचे अनेकांना जाणवले.

दरम्यान येथूनच आलाबाद व मासा बेलेवाडी येथील जॅकवेलला विद्युत पुरवठा आहे. त्यामुळे तेथीलही पिण्याच्या पाण्याचे विद्युत पंप बंद झाले होते. मात्र वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती करून तेथील विद्युत पुरवठा सुरळीत करून पाणी चालू केले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​