आदित्यराजवरील कारवाईवेळी पत्रकारांशी हुज्जत

अंगावर धावून जाण्याचाही प्रकार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार
बेळगाव : भाग्यनगर येथील आदित्यराज कॅपिटलवरील प्रशासकीय कारवाईच्यावेळी वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर कर्मचाऱ्यांनी धावून आल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. संतप्त पत्रकारांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली. प्रशासकीय कारवाईचे चित्रिकरण करताना काही महिलांसह कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना जाब विचारला. त्यावेळी वादावादीचा प्रसंग घडला. प्रशासनाने छापे टाकले आहेत, कारवाई सुरू आहे. म्हणून आम्ही येथे आलो आहोत, असे सांगूनही तुम्हाला येथे कोण बोलावले? असे प्रश्न ते विचारत होते.शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले. हा प्रकार घडला त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप केला जात आहे.
टिळकवाडी पोलीस स्थानकासमोर पत्रकारांनी निदर्शने केली. शेवटी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, उपायुक्त नारायण बरमणी आदी वरिष्ठ अधिकारी टिळकवाडी पोलीस स्थानकात दाखल झाले. पत्रकारांशी चर्चा करून त्यांनी कारवाईची ग्वाही दिली. पत्रकारांवर हल्ल्याचे व धावून जाण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. त्यामुळे छायाचित्रकार, पत्रकारांना काम करणे कठीण जात आहे. पोलिसांनी संरक्षण देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
Source link



