Uncategorized

Pandharpur News | श्री विठ्ठल मंदिरातील दर्शन बारीसाठी पॉली कार्बोनेटचा वापर

प्रथमच दर्शन बारीच्या छतासाठी पॉली कार्बोनेट शीटचा वापर
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अंतर्गत दर्शन बारीचे काम पूर्ण झाले आहे. भाविकांना ऊन, वारा, पाऊस यापासून त्रास होऊ नये यासाठी प्रथमच दर्शन बारीच्या छतासाठी पॉली कार्बोनेट शीटचा वापर करण्यात आला आहे. या अत्याधुनिक पारदर्शक छतामुळे भाविकांना मंदिरावरील कळसाचे दर्शन घेता येणार आहे.
नव्याने उभारण्यात आलेल्या दर्शन बारीमुळे भाविकांचे दर्शन अधिक सुलभ झाले आहे. येथील विठ्ठल मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. मंदिरातील जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे डिसेंबरअखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कामाला वेग आला आहे.
भारतीय पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार मंदिरातील हत्ती दरवाजा ते रुक्मिणी मंदिर पर्यंत नव्याने दर्शन रांग तयार करण्यात आली आहे. नव्या दर्शन रांगेमुळे भाविकांचा त्रास कमी झाला आहे. तसेच ऊन, पावसापासून संरक्षण झाले आहे. येथील दर्शन बारीसाठी प्रथमच पॉली कार्बोनेट सीटचा वापर करण्यात आला आहे. ३५ फूट लांब आणि ३ फूट रुंद अशी दर्शन रांग तयार करण्यात आली आहे.
अत्याधुनिक आणि आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या दर्शन रांगेवरील छत हे पूर्णपणे पारदर्शक आहे. रांगेतून भाविकांना मंदिरावरील कळस दर्शन व्हावे अशी यामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांमधून या नव्या सुविधेमुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
दर्शन रांग सुलभ व जलद होण्यास मदत
विठ्ठल मंदिरात दर्शन रांगेसाठी पॉली कार्बोनेट शीटचा वापर करण्यात आला आहे. अत्याधुनिक साधनांचा वापर केल्यामुळे भाविकांना दर्शन रांगेतून मंदिरातील कळसाचे दर्शन घेता येत आहे. शिवाय दर्शन रांग सुलभ व जलद होण्यास मदत झाली आहे. ऊन, वारा, पाऊस यापासून भाविकांचे संरक्षण देखील होणार आहे.
प्रवीणकुमार घम, व्यवस्थापक, विठ्ठल मंदिर, पंढरपूर


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​