विजया दक्षता हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन ; आरोग्य जनजागृती

टिळकवाडीतील गणेश मंदिर परिसरात आरोग्य जनजागृती उपक्रम
बेळगाव– बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वेगेटजवळील श्री गणेश मंदिर परिसरात नागरिकांच्या आरोग्य जनजागृतीसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. खानापूर रोडवरील विजया दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे डॉ. नम्रता बाबली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात नागरिकांची रक्तदाब, मधुमेह आणि गरजेनुसार मोफत ईसीजी तपासणी करून त्यांना निरोगी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि यशस्विनी आरोग्य विमा योजनेंतर्गत मिळणाऱ्या मोफत व कॅशलेस उपचारांची महत्त्वाची माहिती नागरिकांना देण्यात आली.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे सदस्य दामोदर भोसले, राजू जाधव आणि सुरेश पाटील यांनी विशेष सहकार्य केले. स्थानिक नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या शिबिरादरम्यान आजारांचे लवकर निदान आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. शिबिराच्या सांगतेवेळी आयोजकांनी यात सहभागी झालेले नागरिक, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे विशेष आभार मानले.
Source link



