Uncategorized

इन्सुलीतील रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मुंबईत उपोषण; अनंत कुडव यांचा मैदानावर लढा

सावंतवाडी / प्रतिनिधी : इन्सुली मुख्य रस्ता ते विसोटीमार्गे ढवळ या शासकीय नोंद असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता वाहतुकीस खुला करावा, या मागणीसाठी इन्सुली येथील अनंत मधुकर कुडव यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आज दुपारपासून उपोषण सुरू केले आहे.

कुडव हे काल गणेशमूर्ती घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी उपोषण करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी गणेशमूर्ती घेऊन तेथे उपोषण करण्यास अटकाव केल्यानंतर त्यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले.

कुडव यांच्या म्हणण्यानुसार, इन्सुली मुख्य रस्ता ते विसोटीमार्गे ढवळ हा पूर्वीच्या ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये रस्ता क्रमांक 23 म्हणून नोंद असून त्याची रुंदी 12 फूट आणि लांबी सुमारे 450 मीटर आहे. या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने तो बंद होण्याच्या स्थितीत आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून दैनंदिन वाहतुकीवरही परिणाम होत आहे.

आपत्कालीन परिस्थितीत मोठी अडचण

रस्ता अरुंद आणि अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा रिक्षा गावात आणताना मोठी अडचण निर्माण होत असल्याचे कुडव यांनी म्हटले आहे. विशेषतः गर्भवती महिला, वृद्ध नागरिक तसेच आजारी व्यक्तींना तातडीची वैद्यकीय मदत मिळवून देताना या रस्त्याच्या समस्येचा फटका बसत असल्याचा दावा त्यांनी केला.

तीन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा

हा शासकीय नोंद रस्ता मोकळा करून देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक ग्रामपंचायतीपासून जिल्हास्तरावरील विविध शासकीय कार्यालयांकडे पाठपुरावा करत असल्याचे कुडव यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात रस्ता तातडीने रहदारीसाठी खुला करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप प्रत्यक्षात रस्ता खुला करण्यात आलेला नसल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

याशिवाय गावनकाशाप्रमाणे असलेले पाणंद रस्तेही अतिक्रमणामुळे बंद झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रश्नावर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने शासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता अतिक्रमणमुक्त करावा, अशी मागणी कुडव यांनी केली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​