Uncategorized

मळगाव येथील अपघातात मळेवाडचा तरुण गंभीर

सावंतवाडी । प्रतिनिधी

सावंतवाडी रेल्वे स्टेशनसमोर दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अपघातात ओंकार आनंद कारिवडेकर (22, रा. मळेवाड) हा गंभीर जखमी झाला. तर त्याच्या सहकाऱ्यालाही दुखापत झाली आहे. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पल्सर दुचाकीस्वार मळेवाडच्या दिशेने जात होता. तर अल्टो कार मळेवाड येथून सावंतवाडीच्या दिशेने येत होती. रेल्वे स्टेशन समोर दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. यात ओंकार कारिवडेकर दुचाकीवरून उडून कारच्या मागील भागात रस्त्यावर कोसळला. या दरम्यान सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या १०२ रुग्णवाहिकेने दोन्ही जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​