Uncategorized

केएचएमएच्या नूतन पदाधकार्‍यांचा पदग्रहण सोहळा

कर्नाटक होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन: वैज्ञानिक परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : कर्नाटक होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन (केएचएमए) बेळगाव विभागाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ व वैज्ञानिक परिसंवाद उत्साहात पार पडला. अध्यक्ष डॉ. विवेकानंद वेर्णेकर, कार्याध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत, कार्याध्यक्ष डॉ. श्रेयस जिनराळकर तर सचिवपदाचा डॉ. संतोष मगदूम यांनी पदभार स्वीकारला. हा कार्यक्रम गांधी भवनमध्ये पार पडला. कार्यक्रमाची सुऊवात प्रार्थनागीताने झाली. समारंभाचे उद्घाटन डॉ. वीरब्रह्मचारी यांच्या हस्ते झाले. डॉ. सोनाली सरनोबत यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. केएचएमएचे उपाध्यक्ष डॉ. जयंत ए. बी. यांनी डॉ. हॅनेमन यांचा जीवनपरिचय करून दिला. त्यानंतर डॉ. ए. राजेश यांनी राज्यस्तरीय केएचएमएच्या कार्याचा आढावा घेतला.

या पदग्रहण समारंभानंतर आयोजित वैज्ञानिक परिसंवाद कार्यक्रमात कोल्हापूर येथील एसजेपीईएस होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या शरीरक्रिया विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संतोष रानडे यांनी ‘शास्त्रीय होमिओपॅथिक उपचार पद्धतीत प्रगत निदान उपकरणांचा वापर“ या विषयावर व्याख्यान देत आधुनिक निदान पद्धती आणि पारंपरिक होमिओपॅथिक तत्त्वांच्या एकात्मतेचे महत्त्व स्पष्ट केले. गडहिंग्लजचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी ‘होमिओपॅथीअंतर्गत गंभीर ऊग्ण व त्यांचे व्यवस्थापन“ या विषयावर मार्गदर्शन करताना जटिल ऊग्णांच्या उपचारातील अनुभव आणि व्यावहारिक दृष्टिकोन उपस्थितांसमोर मांडले.

तर ए. एम. शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. किरण पाटील यांनी ‘होमिओपॅथिक व्यावसायिकांसाठी नीतिमत्ता“ या विषयावर भाष्य करताना वैद्यकीय व्यवसायातील जबाबदारी, कायदेशीर जाणीव आणि नैतिक आचारसंहितेचे महत्त्व अधोरेखित केले. परिसंवादादरम्यान सहभागी चिकित्सक व विद्यार्थ्यांनी वक्त्यांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. त्यामुळे हा कार्यक्रम ज्ञानवर्धक व व्यावसायिक अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणणारे प्रभावी व्यासपीठ ठरला. यावेळी डॉ. अऊण हुली, डॉ. दशरथ बामणे, डॉ. अऊणकुमार जमदाडे, डॉ. किरण पाटील, डॉ. रूपाली तेलंग, डॉ. ए. राजेश, डॉ. ज्योतीष खोट आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. संतोष मगदूम यांनी आभार मानले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​