Uncategorized

Sangli News | तर २१ दिवसांनंतर तुमची हरकत ऐकली जाणार नाही!’; सांगली महापालिकेच्या ‘या’ अजब नियमाने खळबळ

                                       सांगलीत घरपट्टी वाढीवर संताप!

सांगली : महापालिकेची घरपट्टीवाढलोकांना सोसणार नाही. लोकांना दिलेल्या नोटिसीमधील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी केली आहे. करवाढ करून घरपट्टी च्या नोटीस येत आहेत. बहुतांश लोकांस सदर करवाढ मान्यही नाही. आणि सोसणारी पण नाही.आयुक्तांनी काही ठराविक लोकांची मीटिंग बोलवून त्यात या करवाढीचे एक प्रेझेन्टेशन दिलं होतं.

त्या मीटिंगमध्ये त्यांनी असं बचन दिले होते, की ग्राहकाचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय अंतिम मागणीपत्र दिलं जाणार नाही. पण सदर येत असलेल्या नोटिशीत २१ दिवसानंतर कोणतीही हरकत स्वीकारली जाणार नाही असं माणसाची घरपट्टीस नोंदणी करतांना सर्वच कागदपत्रे, व शहानिशा करूनच नोंदणी केली जाते, मग आत्ता नव्याने ही सर्व कागदपत्रे का मागत आहात? त्यामुळे मनपा प्रशासनाविरोधात नागरिकात रोष आहे. त्यामुळे प्रशासनाने पुनर्रविचार करून या जाचक अटी रद्द कराव्यात.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​