Uncategorized

Shirala | शिराळा ते ईश्वरपूर मार्गावर अचानक पोहोचली पोलिसांची फौज; शनिवारी सायंकाळी नेमकं काय घडलं?

                                       शिराळा पोलिसांची धडक मोहीम

शिराळा : शिराळा ते ईश्वरपूर मार्गावर शिराळा पोलिसांकडून शनिवारी सायंकाळी वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा यांच्या आदेशानुसार सदरची मोहीम पार पडली. या मोहिमेदरम्यानवाहन चालक परवाना, वाहनांची कागदपत्रे, सीट बेल्ट, हेल्मेट आदींची सखोल तपासणी करण्यात आली.

विनापरवाना वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रबास, भरधाव वेगाने वाहन चालविणे, कर्णकर्कश सायलेन्सर वापरणे, सीटबेल्टचा वापर न करणे अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली.या कारवाईत बिनाहेल्मेट वाहन चालविणारे ५, सीटबेल्ट न वापरणारे ३, विनापरवाना वाहन चालविणारे अशा १० जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच दारू पिऊन बाहन चालविणे १ अशा प्रकरणांतही कारवाई झाली. यावेळी देशी दारूच्या १ हजार ३०० रुपये किमतीच्या १७बाटल्या जप्त केल्या.

पोलिस निरीक्षकजंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उदय पाटील, तानाजी जाधव, सहाय्यक पोलिस फौजदार महेश गायकवाड, सुभाष पाटील, प्रदीप पाटील, भूषण महाडिक, अमोल कदम, अमर जाधव, राजेंद्र देवळेकर, अभिजीत नायकवडी, रामचंद्र भोसले, अमोल भिंगारदिवे आणि उमेश शेटे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​