Uncategorized

पारदर्शक शीर असणारा मासा

खोल समुद्रात दडलेल्या असंख्या रहस्यमय प्रजाती माणसांना सातत्याने अचंबित करत असतात. असाच एक अनोखा मासा आहे, ज्याचे नाव बॅरेलाइन आहे. याचे पूर्ण शीर पारदर्शक आहे. लोक याच्या डोक्याच्या आत डोकावू शकतात, याचे डोळे बाहेरूनच दिसून येतात. बॅरेलाइन मासा समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 2600 फूट (800 मीटर) खाली राहतो, जेथे प्रकाश पोहोचणे जवळपास अशक्य आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे याचे पारदर्शक शीर आहे. शिराच्या आतून याचे मोठमोठे हिरव्या रंगाचे चमकणारे डोळे स्पष्टपणे दिसून येतात. ही संरचना माशाला अंधारात अत्यंत चांगल्याप्रकारे शिकार पाहण्यास मदत करते असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. याचे डोळे ट्यूबप्रमाणे आहेत आणि ते वरील दिशेला पाहू शकतात. शिकार वरून येत असल्यास हा मासा त्याला सहजपणे पाहू शकतो. पारदर्शक शीर याला अतिरिक्त सुरक्षा अन् दृष्टी प्रदान करते.

निसर्गाची कमाल

बॅरेलाइन मासा लाखो वर्षांच्या विकासाचा परिणाम असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. खोल समुद्रात दबाव अधिक असतो आणि प्रकाश पोहोचत नाही, तेथे जिवंत राहण्यासाठी या माशाने अनोखी शारीरिक संरचना विकसित केली आहे. या माशाची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

खोल समुद्रातील अन्य जीव

खोल समुद्रात एंग्लर फिश, गुल्पर ईल, वायपर फिश यासारख्या अनेक रहस्यमय प्रजाती आहेत, ज्या बायोलुमिनेसेंसची (स्वत: प्रकाश निर्माण करणे) क्षमता बाळगून आहेत. अशा प्रजातींचे अध्ययन आम्हाला खोल समुद्र अन् पृथ्वीच्या विकासाविषयी नवी माहिती देत असते. निसर्गाने खोल समुद्रात जिवंत राहण्यासाठी या जीवांमध्ये अनोख्या पद्धती विकसित केल्याचे पाहून वैज्ञानिकही अचंबित होत असतात. बॅरेलाइन मासा समुद्राच्या रहस्यमय जगाचे एक छोटेसे उदाहरण आहे, याचे पारदर्शक शीर आणि चमकणारे हिरवे डोळे आमच्या पृथ्वीवर अद्याप खूप काही अनभिज्ञ असल्याची आठवण करून देतात.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​