Precise population data is essential.

केंद्र सरकारच्या धोरणाला शशी थरुर यांचा पाठिंबा
वृत्तसंस्था / देशातील विविध समाजघटकांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनैसर्गिक परिवर्तन होत आहे. ही बाब देशासाठी चिंतेची आहे. त्यामुळे या लोकसंख्या परिवर्तनाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने एका विशेष समितीची स्थापना केली आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाचे समर्थन काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केले आहे. देशात कोणत्या समाजघटकाची किती लोकसंख्या आहे, हे समजून घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी निर्णयाचे समर्थन करताना व्यक्त केले.
केंद्र सरकारकडून समितीची स्थापना, ही एक महत्वपूर्ण घडामोड आहे. या निर्णयाच्या राजकीय परिणामांची चर्चा होणे आवश्यक असले, तरीही देशाची लोकसंख्या नेमकी किती, तसेच कोणत्या भागांमध्ये आणि कोणत्या समाजघटकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात अशा प्रकारे परिवर्तन होत आहे, याची माहिती असणेही तितकेच आवश्यक आहे. आपण कोणत्या घटकाच्या किती लोकसंख्येशी संबंधित आहोत, हे सरकारला आणि जनतेलाही माहीत असावयास हवे. त्यादृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
घडत आहेत महत्वाचे बदल
देशाच्या लोकसंख्या प्रमाणबद्धतेत महत्वाची परिवर्तने घडत आहेत, हे आपण पहात आहोत. अनेक वेगवेगळ्या प्रकारची ही परिवर्तने आहेत. त्यांची नेमकी माहिती आपण घेतली नाही, तर काही जणांकडून लोकसंख्येच्या अनधिकृत माहितीचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. लोकसंख्येची आकडेवारी परिपूर्ण नसेल, तर ती बाब निश्चितच चिंताजनक आहे. त्यामुळे मी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे समर्थन करीत आहे. विविध समाजघटकांच्या लोकसंख्येतील प्रमाणाविषयी नेमकी माहिती असली तरच अशा लोकसंख्येशी व्यवहार करता येतील, हे उघड आहे. सध्या देशात जनगणनेचे कार्यही होत आहे. त्याच्या समवेत लोकसंख्या प्रमाणातील परिवर्तनाची माहितीही उघड झाली, तर देशाला तिचा लाभ होईल. प्रत्येकाने या स्थितीचे गांभीर्य समजून घ्यावे, असे आवाहनही शशी थरुर यांनी केले आहे.
समितीची स्थापना
लोकसंख्याप्रमाणाच्या सखोल माहितीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी एका विषेश समितीची स्थापना केली आहे. घुसखोरीमुळे देशाच्या काही भागांमध्ये लोकसंख्या प्रमाणात अनैसर्गिक परिवर्तन घडत आहे. त्याची माहिती घेऊन घुसखोरांच्ााr हकालपट्टी करण्यासाठी केंद्र सरकार उपाय योजना करीत आहे.
Source link



