Uncategorized

माजी खासदार विनायक राऊतांच्या कौटुंबिक प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नको – साक्षी वंजारी

सावंतवाडी: माजी खासदार विनायक राऊत यांच्या कौटुंबिक प्रकरणाला राजकीय किंवा सामाजिक रंग देऊन त्याचे भांडवल करू नये, असे आवाहन काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी केले आहे.
त्या म्हणाल्या, “हे एक वैयक्तिक आणि कौटुंबिक स्वरूपाचे प्रकरण आहे. अशा विषयाकडे संवेदनशीलतेने आणि मानवी दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे. कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याचे राजकीय भांडवल करणे किंवा त्यावरून समाजात संभ्रम निर्माण करणे योग्य नाही.”
यापुढे त्या म्हणाल्या की, लोकशाहीत मतभेद असू शकतात; मात्र व्यक्तीच्या कौटुंबिक आयुष्याला राजकारणात ओढणे ही चुकीची प्रवृत्ती आहे. अशा प्रकरणांमध्ये सर्वांनी संयम बाळगून जबाबदारीने वागावे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा राजकीय हेतूने होणाऱ्या चर्चांना खतपाणी घालू नये., ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी सौ. राऊत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली, ती निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, अशीच संवेदनशीलता, तत्परता आणि निष्पक्ष भूमिका समाजातील इतर महिला व मुलींशी संबंधित गंभीर प्रकरणांमध्येही, भोंदू बाबा नाशिक खरात प्रकरण यावर कोणतीही प्रतिक्रिया न दिलेल्या महिला यांच्या कडून ही अपेक्षा आणि विनंती आहे. न्याय आणि सहानुभूती हे व्यक्ती, पक्ष किंवा विचारसरणी न पाहता प्रत्येक महिलेसाठी समान असले पाहिजेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​