थायलंड स्पर्धेतील सिंधूचे आव्हान समाप्त

वृत्तसंस्था, बँकॉक
विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या येथे सुरू असलेल्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूचे महिला एकेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या यामागुचीने संपुष्टात आणले.
5 लाख अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या सुपर 500 थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जपानच्या टॉपसिडेड अकाने यामागुचीने पीव्ही सिंधूचा 19-21, 21-18, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. यामागुची आणि सिंधू यांच्यात यापूर्वी आतापर्यंत 28 सामने झाले असून त्यापैकी सिंधूने 15 तर यामागुचीने 13 सामने जिंकले आहेत. गेल्या जानेवारीत झालेल्या मलेशिया खुल्या सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने यामागुचीचा पराभव केला होता. बँकॉकमधील स्पर्धेत सिंधूने पहिल्या गेममध्ये आपल्या उत्कृष्ट आणि अचूक स्मॅश फटक्याच्या जोरावर 21-19 अशा फरकाने हा गेम जिंकून यामागुचीवर आघाडी मिळविली. पण त्यानंतर पुढील दोन गेम्समध्ये यामागुचीने अचूक आणि दर्जेदार खेळाच्या जोरावर सिंधूचे आव्हान संपुष्टात आणले. बँकॉकमधील या स्पर्धेत सहाव्या मानांकीत सिंधूने डेन्मार्कच्या शुल्झचा 21-13, 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
Source link



