Satara News | तरुण भारत’चा दणका अन् पाटण नगरपंचायत ताळ्यावर! महिनाभराचा ‘तो’ कचरा कोंडाळा एका रात्रीत गायब?

तरुण भारतच्या वृत्तानंतर पाटण नगरपंचायत अॅक्शन मोडवर
पाटण : शहरातील कचऱ्याच्यासमस्येबाबत ‘तरुण भारत ने आवाज उठवल्यानंतर पाटण नगरपंचायत अॅक्शन मोडवर आली आहे. गेल्या महिनाभर बंद असलेल्या घंटागाड्या अखेर सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच शहरात रस्त्याकडील कचऱ्याचे ढीग उचलण्यास सुरुवात केली आहे यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या महिनाभरापासून घंटागाड्या बंद असल्याने घरोघरी मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. अनेकांनी हा कचरा शहरातील विविध रस्त्यावरटाकल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिग दिसू आले होते. याबाबत ‘तरुण भारत’ने कचराच कचरा चोहीकडे, घंटागाड्या गेल्या कुणीही असे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल तातडीने घेऊन दुसऱ्याच दिवशी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
तसेच रस्त्याकडे टाकण्यात आलेल्या कचरा उचलण्यास सुरूवात केली आहे. यामुळे रोगराई रोखण्यास मदत होणार आहे. शहरातील मंडई परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला होता. हा संपूर्ण कचरा उचलला आहे. तसेच रस्त्याकडेला टाकण्यात आलेल्या कचरा उचलण्यास सुरूवात झाली आहे.
नगरपंचायतीने आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने पावले उचलत घंटागाड्या सुरू केल्या असून कचराही उचलला जात असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. नागरिकांनीही जबाबदारी ओळख रस्त्यावर कचरा टाकू नये तसेच इतरांनाही कचरा टाकण्यास प्रतिबंध केल्यास शहर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.
स्वच्छतेत सातत्य हवे
नगरपंचायतीने घंटागाड्या सुरू करून कचरा उचण्यास सुरूवात केल्यास रोगराईस आळा बसणार आहे. मात्र नगरपंचायतीने यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे, नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखावी, -नितीन पिसाळ, सामाजिक कार्यकर्ते
Source link



