त्रिंबक येथे जपानी शैलीतील आकर्षक पॅगोडाचे लोकार्पण

आचरा : प्रतिनिधी
त्रिंबक बौद्ध विकास मंडळ त्रिंबक आयोजित भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी जपानी शैलीत उभारण्यात आलेल्या आकर्षक पॅगोडाचे लोकार्पणही करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात सम्राट अशोक नगर प्रवेशद्वाराजवळील बुद्ध शिल्पासमोर धार्मिक विधींनी झाली. आदरणीय सुर्यकांत कदम आणि विलास वळंजू यांनी विधी पार पाडले. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष महेंद्र जाधव आणि ज्येष्ठ सल्लागार दत्ता पवार यांच्या हस्ते पॅगोडाचे लोकार्पण करण्यात आले. सभेच्या प्रारंभी कु. मंजुरी जाधव, कु. सान्वी जाधव आणि अनन्या जाधव यांनी भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता पवार यांनी केले.यावेळी श्रीकांत जाधव, अशोक बागवे, सुरेंद्र सकपाळ, अरविंद कदम, योगेश साटम, चेतन साटम आणि प्रवीण घाडीगांवकर यांनी बौद्ध विकास मंडळाच्या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक केले. अध्यक्ष महेंद्र जाधव यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण जाधव यांनी केले. या प्रसंगी सरपंच किशोर त्रिंबककर, ग्रामसेवक माधुरी कामतेकर, अनिल कदम, पोलीस पाटील सिताराम सकपाळ, सारंगी चव्हाण, सीमा घाडीगांवकर, दिपा त्रिंबककर, दिनेश त्रिंबककर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.संध्याकाळी महिलांचा “पुष्पगंध” कार्यक्रम उत्साहात पार पडला. तसेच रात्री १० वाजता संदेश रावले यांच्या मराठी, हिंदी आणि भीमगीतांच्या बहारदार संगीत कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. सुप्रसिद्ध सूत्रसंचालक राजेश कदम यांनी कार्यक्रमाला प्रभावी साथ दिली. संपूर्ण जयंती उत्सव स्थानिक तसेच मुंबईस्थित कार्यकर्त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पाडला.
Source link



