Uncategorized

विधानभवनासमोर अचानक बुलेटचा आवाज! CM फडणवीसांची ‘दबंग’ एन्ट्री पाहून सगळेच अवाक

                              विधानभवन परिसरात बुलेट राइडची चर्चा

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक अनोखा संदेश दिला. नेहमीच्या आलिशान वाहनांच्या ताफ्यात दिसणारे मुख्यमंत्री आज चक्क बुलेट चालवताना दिसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसस्वतः बुलेट चालवत थेट विधानभवनात इंट्री केली… आणि सर्वांचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शासकीय खर्चात कपात करण्यासाठी पुढील सहा महिन्यांसाठी मोठे सरकारी कार्यक्रम रद्द करण्याची घोषणाही केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी बुलेटवरून विधानभवनात दाखल झाले. त्यांच्या मागे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार बसले होते. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यातील अधिकारी आणि पोलीस कर्मचारीही चारचाकी वाहनांऐवजी दुचाकींवरूनच आले होते. त्यामुळे विधानभवन परिसरात काही काळ उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते.इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि अनावश्यक सरकारी खर्च टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. देशासमोर इंधन बचतीचे मोठे आव्हान आहे. प्रत्येकाने शक्य तितकी काटकसरीची भूमिका घेतली पाहिजे असे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, राज्य सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी मोठे शासकीय समारंभ, उद्घाटने आणि खर्चिक कार्यक्रम टाळण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. या निर्णयामुळे सरकारी यंत्रणेला खर्च नियंत्रणासोबतच ऊर्जा बचतीलाही हातभार लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​