Uncategorized

दैवज्ञ गणपती मंदिर परिसरातील रस्त्याची समस्या मार्गी

नगराध्यक्षा श्रद्धा भोसलेंकडून प्रत्यक्ष पाहणीसह दुरुस्तीचे आदेश

सावंतवाडी –

दैवज्ञ गणपती मंदिर परिसरातील वर्दळीच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची दखल घेत नगराध्यक्षांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि संबंधित विभागाला तातडीने दुरुस्तीचे निर्देश दिले आहेत.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दैवज्ञ गणपती मंदिर परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते. यामुळे रस्त्यावर खड्डा तयार झाला असून, हा रस्ता वर्दळीचा असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी या गंभीर समस्येबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.नागरिकांच्या तक्रारीची तत्परतेने दखल घेत नगराध्यक्षांनी स्वतः मंदिर परिसरात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी खालील महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.रस्त्यावरील खड्डा तातडीने भरून काढण्याचे आणि पावसाळी पाण्याचा निचरा होईल याची व्यवस्था करण्याचे आदेश संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.त्यासोबत लगतच असलेला नाला आरोग्य विभागाला तातडीने साफ करून घेण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नगरसेवक देव्या सूर्याजी, बांधकाम विभागाचे अधिकारी, व नागरिक उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​