बांधकाम अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही कार्यवाही नाही

मळगाव घाटात वारंवार अपघात ; जितेंद्र गावकरांनी व्यक्त केली नाराजी
न्हावेली /वार्ताहर
मळगाव घाटातील दरीत पुन्हा एकदा इको कार कोसळल्याने पंचायत समिती सदस्य जितेंद्र उर्फ जितू गांवकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.पंचायत समिती सभेत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही कार्यवाही होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्या सावेजनिक बांधकाम व वन विभाग यांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज पुन्हा एकदा मळगाव घाटात अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र. लक्ष वेधूनही कार्यवाही होत नसल्याने पंचायत समिती सदस्य जितू गांवकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन त्या ठिकाणी रेलींग उभारावे आणि होणारे अपघात टाळावे अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या असणाऱ्या संरक्षक कठड्याचे बांधकाम निकृष्ट असून होणारे बांधकाम चांगल्या प्रकारचे व्हावे यासाठी उद्या प्रशासनाला निवेदन देणार असून वारंवार होणारे अपघात बघता प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Source link



