Uncategorized

Solapur News : मंत्री गडकरी यांच्या हस्ते चार महामार्गांचे भूमिपूजन..

                    अक्कलकोट तालुका राष्ट्रीय स्तरावरील दळणवळणाशी जोडला जाणार

अक्कलकोट : अक्कलकोट ते सोलापूर जिल्ह्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या चार महामार्गाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवार, १४ मे रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याने विविध स्तरावर तयारीला सुरुवात झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणीशेट्टी यांनी दिली. या प्रकल्पांमध्ये सूरत-चेन्नई महामार्गाचा भाग असलेल्या नाशिक-अक्कलकोट महामार्गासह वळसंग-मोहोळ, वागदरी अक्कलकोट आणि अक्कलकोट तोळणूर या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे.

हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर अक्कलकोट तालुका राष्ट्रीय स्तरावरील दळणवळण व्यवस्थेशी अधिक वेगाने जोडला जाणार असून व्यापार, उद्योग, पर्यटन आणि कृषी वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे हा देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे.

गुजरातवरील सूरतपासून तामिळनाडूतील चेन्नईपर्यंतचा हा मार्ग महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशाला जोडणार आहे. या महामार्गामुळे मुंबई-पुणे मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून प्रवासाचा वेळही लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. नाशिक-अक्कलकोट मार्गामुळे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील संपर्क अधिक गतिमान होणार आहे.

वागदरी-अक्कलकोट आणि अक्कलकोट-तोळणूर मार्गामुळे कर्नाटक सीमावर्ती भागाची जोडणी मजबूत होणार आहे. मोहोळ-वळसंग हा मार्ग तर सोलापूर जिल्ह्यासाठी बाह्यवळण रस्ता म्हणून महत्त्वाचा ठरणार असून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार आहे.

या महामार्गासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आमदार कल्याणीशेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागले आहेत. भूमिपूजन सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक यंत्रणांकडून तयारी सुरू असून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​