Uncategorized

Shirwade News | शिरवडे रेल्वे स्थानकावर मृत्यूचा सापळा! १० फूट उंच भिंत अन् चार रुळांचा धोकादायक प्रवास

                            दीड वर्षांपासून रखडलेला शिरवडे रेल्वे पूल;

मसूर : शिरवडे रेल्वे स्थानकपरिसरात रेल्वेमार्ग रुंदीकरणाचे काम पूर्णत्वास गेले असले तरी पादचारी पूल उभारणीचे काम अद्यापही संथ गतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः नडशी, उत्तर कोपर्डे व शिरवडे येथील रहिवाशांना याचा मोठा फटका बसत असून, रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.एक ते दीड वर्षापासून सुरू असलेल्या या पुलाच्या कामाची प्रगती आजपर्यंत ७५ टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिली आहे. परिणामी, विद्यार्थ्यांसह नागरिकांना दररोज जीब धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडावे लागत आहेत.

या परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी यशवंतनगरमधील शाळा तसेच कराडमधील महाविद्यालयात दररोज ये-जा करतात. पर्यायी मार्ग उपलब्ध असला तरी तो एक ते दीड किलोमीटरने लांब असल्यानेअनेकजण नडशी कॉलनीकडील धोकादायक कच्चा रस्त्याचा वापर करतात. या ठिकाणी रेल्वे रुळांना वळण असल्याने भरधाव गाड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे लहान मुले, वृद्ध व महिलांसाठी धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच मार्गावर यापूर्वी अनेक अपघात होऊन जीवितहानी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

सध्या या ठिकाणी दोन मुख्य व दोन क्रॉसिंग असे चार रेल्वे रुळ कार्यरत आहेत. दुहेरीकरणामुळे गाड्यांची संख्या वाढली असून धोका अधिक तीव्र झाला आहे.रुंदीकरणावेळी करण्यात आलेल्या खोदकामामुळे जवळपास दहा फूट उंच दगडी भिंत तयार झाली असून ती ओलांडूनच विद्यार्थ्यांना मार्गक्रमण करावे लागते, ही बाब अत्यंत धोकादायक ठरत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून रुळ ओलांडणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले जात असले, तरी पर्यायी सुरक्षित सुविधा देण्याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. पादचारी पुलाचे काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​