Satara accident | भरधाव रिक्षा, समोरून येणारी दुचाकी अन् स्वाती चव्हाण यांचा अखेरचा प्रवास; भोंदवडेतील त्या वळणावर नेमकं काय घडलं?

भोंदवडे-गजवडी मार्गावर भीषण रिक्षा अपघात
सातारा : सातारा तालुक्यातीलभोंदवडे गावच्या हद्दीत गजवडी जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर भरधाव रिश्ताचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिचा दोन वर्षीय मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक सईद मज्जिद इनामदार (वय ५१, रा. समर्थगाव (पुनर्वसन), मूळ रा. मंगळवार पेठ) हा रिक्षा हयगयीने व भरधाव वेगाने चालवत होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीला झाशा मारताना रिक्षावरील नियंत्रण सुटले.
या अपघातात रिक्षामधील स्वाती प्रतीक चव्हाण (वय ३०, सध्या रा. शिवराम सोसायटी, शास्त्रीनगर, डोंबिवली पश्चिम, मुंबई: मूळ रा. सरफडेवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) व त्यांचा दोन वर्षीय मुलगा प्रणीत प्रतीक चव्हाण हे रिक्षाबाहेर फेकले गेले. दोघेही रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले. अपघातात स्वाती चव्हाण यांच्या डोक्यास व उजव्या पायास गंभीर दुखापत झाली होती. तसेच प्रणीतच्या कपाळ, पोट व पायालादुखापत झाली आहे.
स्वाती चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी बहीण सारिका रविराज आरगडे (वय ४३, मूळ रा. आरगडवाडी, पोस्ट दहिवड, ता. जि. सातारा; सध्या रा. सरस्वती टॉवर, प्रगती नगर, नालासोपारा पूर्व, पालघर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात रिक्षाचालक सईद इनामदार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
Source link



