Uncategorized

गुजरात राजस्थानला मागे टाकण्यास सज्ज

गुजरातच्या संघाला सध्या डळमळीत स्थितीत असलेल्या रॉयल्सविऊद्ध विजयाची अपेक्षा

वृत्तसंस्था/जयपूर

उत्साहाने भारलेला गुजरात टायटन्स संघ आपली विजयाची मालिका कायम राखण्यासाठी आणि गुणतालिकेत सध्या डळमळीत स्थितीत असलेल्या राजस्थान रॉयल्सला मागे टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. आज शनिवारी सवाई मानसिंह स्टेडियमवर होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या या सामन्यात गुणतालिकेत मध्यम स्थानी असलेल्या या दोन संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. गुणतालिकेत 2022 चे विजेते गुजरात टायटन्स (-0.147) आणि चौथ्या क्रमांकावर असलेले 2008 चे विजेते राजस्थान रॉयल्स (0.510) यांच्यात केवळ ‘नेट रन रेट’चाच फरक आहे. कारण आतापर्यंत या दोन्ही संघांची कामगिरी जवळपास सारखीच राहिली आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ प्रत्येकी 10 सामने खेळले असून त्यात त्यांनी प्रत्येकी सहा विजय आणि चार पराभव नोंदले आहेत.

मात्र शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातचा संघ सध्या डळमळीत स्थितीत असलेल्या रॉयल्सविऊद्ध विजयाची अपेक्षा बाळगून असेल. कारण रॉयल्सला त्यांच्या मागील पाच सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. टायटन्सने सलग तीन सामन्यांत विजय मिळवला असून आता ते गुणतालिकेतील पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. रॉयल्सचा कर्णधार रियान परागने संघाच्या पहिल्या डावातील 6 बाद 225 धावांत 90 धावांची खेळी केली होती, परंतु दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध ही धावसंख्या पुरेशी ठरली नाही. दिल्लीने सात गडी राखून आणि पाच चेंडू बाकी असतानाच हे लक्ष्य सहज गाठले. हा सलग दुसरा प्रसंग होता जेव्हा पहिल्या डावात 220 हून अधिक धावा करूनही रॉयल्सला त्या धावसंख्येचे रक्षण करणे जमले नाही.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजीची फळी वैभव सूर्यवंशी (404 धावा), यशस्वी जैस्वाल (312) आणि ध्रुव जुरेल (290) यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून असून त्यांना आपल्या कर्णधाराकडून खालच्या फळीत मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. खालच्या फळीत सध्या केवळ डोनोव्हन फरेरा (229 धावा) हाच फलंदाज 150 किंवा त्याहून अधिक स्ट्राईक रेटने धावा करताना दिसत आहे. रॉयल्सच्या फलंदाजीच्या फळीतील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून जुरेलने नि:संशयपणे आपली छाप पाडली आहे. परंतु तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना डावाच्या सुऊवातीच्या टप्प्यात धावांचा वेग वाढवण्यात तो काहीसा कमी पडत असल्याचे दिसून आले आहे.

यंदाचा हंगाम गोलंदाजांसाठी अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक ठरला असला, तरी रॉयल्सला आपल्या गोलंदाजीतील समस्यांवर, खास करून डावाच्या मधल्या षटकांमधील अडचणींवर उपाय शोधावे लागतील. टायटन्सच्या दृष्टीने पाहता अगदी योग्य वेळी आपला खेळ शिखरावर पोहोचत असल्याचे पाहून त्यांना नक्कीच समाधान वाटत असेल. गिल (378 धावा) हा सातत्याने धावा करणारा फलंदाज ठरला आहे आणि आपल्या डावाचे मोठ्या धावसंख्येत रूपांतरित करण्यास तो उत्सुक असेल. साई सुदर्शन (385) देखील आपल्या सध्याच्या फॉर्मचा पुरेपूर फायदा उठवण्यासाठी प्रयत्नशील राहील. त्याने आपल्या मागील चार डावांमध्ये दोन अर्धशतके व एक शतक झळकावले आहे. जोस बटलरनेही (335) पुन्हा एकदा सातत्य राखलेले असल्याने टायटन्सची वरची फळी धोकादायक बनली आहे.

राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल. डी. फरेरा, शुभम दुबे, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नोंद्रे बर्गर, तुषार देशपांडे, रवी बिश्नोई.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, मानव सुतार, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​