Uncategorized

ओटवणे हायस्कूलचा दहावीचा निकाल ९५:८३ टक्के

ओटवणे प्रतिनिधी

ओटवणे येथील ओटवणे येथील रवळनाथ विद्यामंदिरचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ९५:८३ टक्के लागला. या परीक्षेला बसलेल्या २४ पैकी २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम क्रमांक मानसी महेंद्र वारंग ८६.२० % (५०० पैकी ४३१ गुण), द्वितीय क्रमांक गिरीश कृष्णा वर्णेकर ८५ % (५०० पैकी ४२५ गुण) आणि तृतीय क्रमांक संयुक्त पणे सदिच्छा सदाशिव गावकर आणि सुरभी संदीप गावकर ८४ % (५०० पैकी ४२० गुण) या दोन्ही विद्यार्थिनींनी पटकाविला. या प्रशालेतून विशेष श्रेणीत ६ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १० द्वितीय श्रेणीत ६ विद्यार्थी, तृतीय श्रेणीत १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर, सचिव राजाराम वर्णेकर, उपाध्यक्ष बाबाजी गावकर कोषाध्यक्ष मनोहर मयेकर, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक राजेंद्र देसाई शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​