Satara water shortage | साताऱ्यात पाणी टंचाईची चाहूल; नळाला मोटार लावल्यास थेट जप्ती, मुख्याधिकाऱ्यांचा इशारा

साताऱ्यात पाणीटंचाईचा इशारा; मोटारी लावल्यास जप्ती
सातारा : सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर योजना व कास योजनेमधून पाणी पुरवठा करण्यात येतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने कास धरणाची आणि उरमोडी नदीतील्या पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे सातारा शहरातील नागरिकांनी नळांना मोटारी लावू नये, मोटारी लावल्याचे निदर्शनास आल्यास जप्त करण्यात येतील, अशी सक्त ताकिद नगरपालिकेच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसेच रस्त्यावर पाणी मारु नका, गाड्या धुवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याचे उन्हाळ्याचे दिवस असल्याने शहरात पाण्याची टंचाई भासू नये याकरता सातारा पालिकेच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. उन्हाळ्यामुळे कास आणि उरमोडी नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी खालावत आहे. मे महिन्यात पाण्याचा वापर काटकसरीने करावा याकरता शहरातील प्रत्येकनागरिकांनी आपल्या नळांना तोटया बसवाव्यात, नळांना मोटारी लावू नये, नळांना मोटारी लावल्याचे आढळून आल्यास मोटारी जप्त करण्यात येतील तसेच रस्त्यावर पाणी मारु नये, पाईपने गाड्या धूवू नये, रस्त्यावर कपडे धूवू नये, पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन सातारा पालिकेचे मुख्याधिकारी बिनोद जळक यांनी केले आहे.
गाठला तळ
शहराच्या मंगळवार तळे परिसर, व्यंकटपुरा पेठेच्या काही भागाला महादरे तळयाचे पाणी पुरवण्यात येते. याच तळयाची पातळी खालावली असल्याने काही प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या परिसरातील नागरिकांची कासचे पाणी देण्याची मागणी होत आहे.सातारा शहरातील पश्चिम भागात असलेल्या मंगळवार तळे परिसर आणि व्यंकटपुरा पेठेच्याकाही भागाला महादरे तळ्याचे पाणी पुरवण्यात येते. याच तळ्याचे पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे या परिसरातील पाण्याची काहीशी टंचाई निर्माण झालेली आहे.
त्यामुळे नागरिकांनी या परिसरात कासचे पाणी देण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्याच अनुषंगाने नगरसेवक अविनाश कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, संध्याकाळी या परिसराला कासच्या पाण्याच्याव्यवस्था करण्यात आली आहे. थोडं पाणी वाढवून लागणार आहे. त्यासंदर्भात मुख्याधिकारी विनोद जळक आणि उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मे महिन्यात पाणी कमी पडू दिले जाणार नाही. कासच्या नवीन पाईपलाईनचे काम एक-दोन महिन्यात पूर्ण होईल, त्यानंतर पाण्याची कसलीही टंचाई भासणार नाही, असे त्यांनी कदम यांनी सांगितले.
Source link



