Uncategorized

राहुल गांधी अंदमान दौऱ्यावर

वृत्तसंस्था/ अंदमान

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारपासून अंदमान आणि निकोबार बेटांच्या दोन दिवसीय दौऱ्यावर पोहोचले आहेत. या दौऱ्यादरम्यान गांधी ग्रेट निकोबार बेटांनाही भेट देतील, असे अंदमान आणि निकोबारमधील काँग्रेस प्रभारी माणिकम टागोर यांनी सांगितले. तसेच या भेटीत ते केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 81,000 कोटी रुपयांच्या ‘ग्रेट निकोबार सर्वसमावेशक विकास प्रकल्पा’बद्दल चिंता व्यक्त करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या 81,000 कोटी रुपयांचा ग्रेट निकोबार प्रकल्प या प्रदेशाच्या नाजूक पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य प्रतिकूल परिणामांमुळे बऱ्याच काळापासून वादाच्या केंद्रस्थानी आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​