आजीला लुटणाऱ्या नातवाच्या मुसक्या आवळल्या

एलसीबीकडून दोघांना अटक
कणकवली: वार्ताहर
स्वतःच्या आजीच्या घरात घुसून दरोडा टाकणाऱ्या नातवाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. साहिल उर्फ सिद्धेश मिलिंद रसाळ (वय २१) आणि मुकेश महेंद्र पाटणे (वय २८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी ओटव, ओटववाडी येथील सुवर्णा रावले यांना ओलीस धरून त्यांच्या गळ्यातील १ लाख ४५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले होते. या घटनेनंतर एलसीबीच्या पथकाने तपास करत २५ एप्रिल रोजी मीरा-भाईंदर येथून या दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले.ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व एलसीबी निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर हवालदार ज्ञानेश्वर तवटे किरण देसाई विल्सन डिसोजा या पथकाने केली. पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत
Source link

