Uncategorized

Sangli News | जत पालिकेच्या मोकाट कुत्र्यांच्या टेंडरला जिल्हाधिकाऱ्यांची क्लीन चिट; कामाचा मार्ग मोकळा!

                             जतमध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर

जत : जत शहरात वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या आणि जनावरांच्या समस्येवर उपाय म्हणून काढण्यात आलेले नसबंदीचे टेंडर कायम ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने पालिकेतील सत्तारूढ गटाला मोठा धक्का बसला आहे. स्थायी समितीने हे टेंडर रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवण्याचा ठराव केला होता, मात्र त्या निर्णयाला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती देत मूल टेंडर प्रक्रियेलाच मान्यता दिली आहे. शहराची लोकसंख्या पन्नास हजारांच्या पुढे गेली असून, गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास तीव्र झाला आहे. नागरिकांवर हल्ले, चावे घेण्याच्या घटना, तसेच रात्रीच्या वेळी वाढलेला त्रास यामुळेनागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यासोबतच मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने हा प्रश्न गंभीर बनला होता.

या पार्श्वभूमीवर पालिकेने मोकाट कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण तसेचजनावरांच्या व्यवस्थापनासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली होती. मात्र स्थायी समितीच्या बैठकीत सत्तारूढ सदस्यांनी है टेंडर जास्त दराचे असल्याचे कारण देत ते रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवण्याचा ठराव मंजूर केला.

या निर्णयाविरोधात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले. सुनावणीनंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मुख्याधिकाऱ्यांनी राबवलेली टेंडर प्रक्रिया नियमबद्ध व योग्य असल्याचे स्पष्ट करत ती कायम ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे स्थायी समितीचा ठराव प्रभावहीन ठरला आहे. या निर्णयामुळे आता मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. मुख्याधिकारी पुढील कार्यवाही करून संबंधित एजन्सीला काम सुरू करण्याचे आदेश देणार असल्याची माहिती मिळत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​