Solapur Crime | बालविवाह अन् अल्पवयीन माता प्रकरण; माहिती लपवणाऱ्या नामवंत रुग्णालयांची पोलिसांकडून चौकशी

सोलापुरात अल्पवयीन माताप्रकरणी मोठी कारवाई
सोलापूर -अल्पवयीन मुलींचे बळजबरीने संसार बाटून त्यांना अकाली मातृत्व लादणाऱ्यांवर सलगर वरती पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. मागील दोन दिवसांत अल्पवयीन माताप्रकरणी तीन तक्रारी दाखल झाल्या असून जेलरोड व एमआयडीसी पोलीस ठाण्यात १८ जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाल हक्क आयोगाने पोलीस प्रशासनासह विविध विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना बाल माताची विचारणा केली. यामुळे पोलीस प्रशासन कडक पावले उचलत अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
यात अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांसह काही डॉक्टरांनी आणि नामवंत रुग्णालयांनी या अल्पवयीन मातांची माहितीपोलिसांपासून लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. मंगळवारी हौसे वस्तीमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून तिला अल्पवयीन माता केल्याप्रकरणी तिच्या आई-वडील-पतीसह आठजणांविरुध्द सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी एमआयडीसी पोलीस हद्दीतील योगेश्वर नगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून तिला अल्पवयीन माता केल्याप्रकरणी मुलीचे आई-वडील, पती, सासू-सासरे आणि तत्कालीन वैद्यकीय अधिकायांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बोकडाच्या पैशावरून मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा
बोकडाच्या पैशावरून मारहाण करून जखमी केल्याप्रकरणीतिघांविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रथमेश भीमराव क्षीरसागर (रा. संतोष नगर, बाळे, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मंगेश महादेव कांबळे, शुभम महादेव कांबळे, विजय काटकर (रा. संतोष नगर, बाळे) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
२० एप्रिल रोजी सायंकाळी प्रथमेश क्षीरसागर हा कुलस्वामीनी मटन व चिकन शॉप येथे होता. त्यावेळी मंगेश कांबळे व इतरांनी येऊन बोकडाचे पैसे देण्याच्या कारणावरून क्षिरसागर यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मंगेश याने क्षीरसागर याच्या कपाळावर दगडाने मारून जखमी केले. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Source link



