Kolhapur Crime | कोल्हापूर हादरले: बापानेच संपवलं पोराला; कोल्हापुरात मद्यपी मुलाचा पित्याकडून खून

कोल्हापुरात मद्यपी मुलाचा पित्याकडून खून
कोल्हापूर -दारुच्या नशेत कानाखाली मारल्याच्या रागातून बापाने चिडून मुलग्याचा चाकूने भोसकून खून केला. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास विक्रमनगर येथील स्वामी समर्थ कॉलनी परिसरात ही घटना घडली. जुनैद गफूर पठाण (वय २१) असे मृताचे नांव आहे. या प्रकरणी गफूर सुलतान पठाण (वय ३९ रा. स्वामी समर्थ नगर, विक्रमनगर) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. या खुनावर पडदा टाकण्यासाठी पठाण कुटुंबीयांनी मृत जुनैदला शिवजयंती मिरवणुकीत काही तरी लागल्याचा बनाव केला, मात्र राजारामपुरीपोलिसांनी शिताफीने तपास करुन या प्रकरणाचा उलगडा केला.
विक्रमनगर येथील स्वामी समर्थ कॉलनीमध्ये संशयीत गफूर पठाण, आई मुमताज, पत्नी वहिदा, मुलगा जुनैद, लहान मुलगा जैद यांच्यासोबत राहत होता. जुनैद स्क्रॅपच्या दुकानात कामाला होता, तर गफूर एका चिकनच्या दुकानात, तर जैद मिळेल ते काम करत होता. जुनैद दररोज रात्री घरामध्ये मद्य प्राशन करुन येत होता. दारुच्या नशेत रात्री उशिरा पर्यंत तो घरात दंगा करत होता. सोमवारी रात्रीही जुनैद मद्य प्राशन करुन आला. यावेळी संशयीत गफूर पठाण याच्यासोबत जुनैदचा जोरदार वाद झाला. दोघंनी एकमेकांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी जुनैदने गफूरच्या कानशिलात लगावली. याचाच राग मनात धरुन गफूरने स्वयंपाक घरातील चाकूने जुनैदवर वार केले.
कानशिलात मारल्याचा राग…
सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जुनैद मद्यप्राशन करुन घरी आला होता. यावेळी जुनैद आणि गफूर यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून चिडून जुनैदने वडील गफूर याच्या कानाखाली लगावली. याचाच राग मनात धरुन गफूरने जुनैदला मारहाण करण्यास सुरुवात केली, या रागातूनच घरातील चाकूने भोसकून त्याने जुनैदचा खून केला.
मद्यपी मुलाचा बापाकडून खून
डाव्या जुनैदच्या पोटावर बाजूस खोलवर वार झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घाबरलेल्या अवस्थेत गफूरने जुनैद जखमी झाल्याची माहिती नातेवाईक आयुब खान, समीर शेख यांना दिली. मिरवणूकीत त्याच्या पोटात जखम झाल्याचे सांगून तत्काळ समीरच्या रिक्षातून जखमी अवस्थेत जुनैदला सिपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना रात्री १ वाजण्याच्या सुमारास जुनैदचा मृत्यू झाला. याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली होती. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
असा झाला उलगडा…
विक्रमनगर येथील शिवजयंतीमिरवणुकीत जखमी झाल्याचा बनाव…सोमवारी रात्री विक्रमनगर येथे शिवजयंती निमीत्त मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. जुनैद हा या मिरवणुकीमध्येच जखमी झाल्याचा बनाव पठाण कुटुंबीयांकडून करण्यात आला. शिवजयंतीच्या मिरवणुकीत काही तरी लागून जखमी झाल्याची नोंदही सीपीआर रुग्णालयात करण्यात आली होती. पठाण कुटुंबीय मिरवणुकीतील घटनेवरच ठाम राहिले होते.
मिरवणूकीमध्ये राजारामपुरी पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र यामध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडे नव्हती. मात्र तरीही गफूरने शिवजयंती मिरवणूकीत ट्रॅक्टर ट्रॉलीचा पत्रा लागून जुनैद जखमी झाल्याचा बनाव केला. मंगळवारी सकाळी पोलीस स्टेशनला जबाब देण्यासाठी बोलविले असता, त्याने मिरवणूकीचाच किस्सा पुन्हा गिरवला. मात्र राजारामपुरी पोलीसांना संशय आल्यामुळे त्यांनी गफूरकडे सखोल चौकशी करत पोलीसी खाक्या दाखविला. यानंतर काही वेळातच गफूरने खुनाची कबूली दिली. पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहाय्यक निरीक्षक रणजीत पाटील, कॉन्स्टेबल शाहू तळेकर, विशाल शिरगांवकर, अमोल पाटील यांनी घटनेचा तपास केला.
जुनैदवर चाकू हल्ला केल्याची
खोलवर जखम आणि अतिरक्तस्त्राव
गफूरने चिकन तोडण्याच्या चाकूने जुनैदवर वार केला. जुनैदच्या पोटावर डाव्या बाजूला खोलवर वार करण्यात आला होता. यामध्ये अतिरक्तस्त्राव झाल्याने जुनैद जागीच बेशुद्ध पडला होता. त्याला आत्तेभाऊ आणि इतर नातेवाईकांनीच सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
रिक्षातून रुग्णालयात… उपचारासाठी पुढे पुढे
माहिती गफूरने इतर नातेवाईकांपासून लपवून ठेवली. मिरवणुकीतच तो जखमी झाल्याचे गफूर सर्वांना सांगत होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास समीर शेख याच्या रिक्षातून जुनैदला सिपीआर नेताना तसेच त्याच्यावर उपचारासाठीही गफूर सर्वांच्या पुढे होता.
Source link



