Uncategorized

राजस्थानचा धडाका हैदराबाद रोखू शकणार ?

वृत्तसंस्था

हैदराबाद : सोमवारी येथे होणाऱ्या आयपीएल सामन्यात आक्रमक राजस्थान रॉयल्स संघ सातत्यहीन सनरायझर्स हैदराबादचा सामना करताना अव्वल स्थानावरील आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. या हंगामात रॉयल्स संघ सर्वोत्तम ठरला असून त्यांनी जवळपास प्रत्येक बाबतीत वर्चस्व गाजवले आहे.

चार सामन्यांतील चार दमदार विजयांनी त्यांचे वर्चस्व अधोरेखित केले आहे, ज्याला त्यांच्या स्फोटक आघाडीच्या फळीने आणि मोठ्या प्रमाणात सुधारलेल्या गोलंदाजी आक्रमणाने बळ दिले आहे. त्यांच्या यशाच्या केंद्रस्थानी यशस्वी जैस्वाल आणि सनसनाटी माजविलेला युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी यांची स्फोटक सलामीची जोडी आहे. त्यांनी पॉवरप्लेमध्ये सातत्याने प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजीला उद्ध्वस्त केले आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ध्रुव जुरेलनेही मोठी भागीदारी रचून संघाला स्थिरता दिली आहे आणि सुऊवातीची गती कायम राखली आहे.

कर्णधार रियान परागच्या नेतृत्वाखालील मधली फळी अजूनही बऱ्याच अंशी अननुभवी आहे आणि आतापर्यंत मिळालेल्या मर्यादित संधींचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतलेला नाही. एकंदरित त्यांच्या वर्चस्वपूर्ण कामगिरीतील ही कदाचित एकमेव किरकोळ चिंतेची बाब आहे. परंतु राजस्थान रॉयल्सच्या परिवर्तनाचे खरे वैशिष्ट्या म्हणजे त्यांची गोलंदाजी आहे. जोफ्रा आर्चरने वेग आणि अचूकतेसह गोलंदाजीचे नेतृत्व केले आहे, तर नांद्रे बर्गरने आपल्या डावखुऱ्या गोलंदाजीचा कोन आणि उसळीचा वापर करून नव्या चेंडूवर फलंदाजांना गोंधळात टाकत धार आणली आहे. संदीप शर्मा व तुषार देशपांडे यांनीही त्यांना चांगली साथ दिली आहे.

मधल्या षटकांमध्ये रवी बिश्नोई हा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला असून नऊ बळींसह तो या यादीत आघाडीवर आहे, तर रवींद्र जडेजाच्या समावेशामुळे त्यांच्या फिरकी गोलंदाजीची ताकद आणखी वाढली आहे. याउलट, सनरायझर्स हैदराबादची कामगिरी चढ-उताराची राहिली आहे. अधूनमधून चमकदार कामगिरी करूनही ते सातत्य राखण्यासाठी झगडत आहेत. आपल्या चार सामन्यांपैकी तीन गमावल्यामुळे हा माजी विजेता संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यांची खेळण्याची योजना तीच आहे आणि ते वेगवान सुऊवातीसाठी ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या स्फोटक जोडीवर अवलंबून आहेत. परंतु दोघांचीही कामगिरी सातत्यपूर्ण राहिलेली नाही.

सनरायझर्स हैदराबाद: इशान किशन (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन, नितीशकुमार रे•ाr, लियाम लिव्हिंगस्टोन, अनिकेत वर्मा, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, हर्ष दुबे, शिवांग कुमार, इम्पॅक्ट बदली खेळाडू : झीशान अन्सारी.

राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, दासून शनाका, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, इम्पॅक्ट बदली खेळाडू : तुषार देशपांडे.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​