Uncategorized

14 मिनिटांसाठी मृत होता!

11 हजार व्होल्टचा झटका बसूनही जीव वाचला

स्क्रॅप मेटलच्या शोधात एका बंद इमारतीत शिरलेल्या इसमाला पुढील काही सेकंद आपले पूर्ण जीवन बदलून टाकतील असा विचारही केला नव्हता. एका स्वीचबोर्डाला स्पर्श करताच त्याच्या शरीरात 11 हजार व्होल्टचा करंट शिरला, याची तीव्रता इतकी अधिक होती की तो अनेक फूट दूर फेकला जात कोसळला. डॉक्टरांनी त्याला 14 मिनिटांपर्यंत क्लिनिकली डेड घोषित केले, 29 दिवसांपर्यत तो कोमात राहिला आणि त्याच्या शरीराचा निम्मा हिस्सा पूर्णपणे होरपळला होता, परंतु आश्चर्याची बाब म्हणजे मृत्यूवर मात करत तो परतला आहे.

ब्रिटनच्या मिडिल्सबामध्ये राहणाऱ्या डॅरेन हॅरिससोबत ही वेदनादायी घटना 2020 मध्ये घडली. त्यावेळी तो 33 वर्षांचा होता, डॅरेन एका जुन्या अन् रिकामी इमरातीत स्क्रॅप मेटल शोधण्यासाठी गेला होता. इमारत तोडण्यापूर्वी वीजेची जोडणी कापण्यात आली असावी असे त्याला वाटले होते, परंतु तसे घडले नव्हते.

स्वीचला स्पर्श

डॅरेनने स्वत:चा हात एका स्विचबोर्डावर ठेवताच त्याच्या शरीरात 11 हजार व्होल्टचा करंट शिरला, ही सिस्टीम सुमारे 980 घरे आणि 78 फॅक्ट्री युनिट्सना वीज पुरवठा करत होती असे सांगण्यात येते. करंटचा प्रभाव इतका भयानक होता की त्याच्या दोन्ही हातांची त्वचा आणि मांस जळून हाडांपर्यंत पोहोचले. तसेच तो दूरपर्यंत फेकला गेला, पण स्वत:ला त्यातून सावरत तो इमारतीबाहेर पडण्यास यशस्वी ठरला.

29 दिवस कोमामध्ये

दुर्घटनेनंतर डॅरेनला रुग्णालयात नेण्यात आले, जेथे त्याची प्रकृती गंभीर होती, डॉक्टरांनुसार तो दोनवेळा मृत्यूसमीप पोहोचला होता आणि एकदा 14 मिनिटांपर्यंत क्लिनिकली डेड होता. सुमारे एक महिन्यानंतर डॅरेशनला शुद्ध आल्यावर त्याला प्रथम आपला मृत्यू झाल्याचे वाटले. रुग्णालयात त्याने स्वत:ला पहिल्यांदा आरशात पाहिल्यावर तो कोलमडून केला. मी जागा झाल्यावर सर्वकाही विचित्र होते, मी संतापात होतो आणि धक्काही बसला होता असे तो सांगतो.

33 शस्त्रक्रिया

डॅरेनच्या शरीराला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी अनेक जटिल शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्याच्या पायांची त्वचा घेत चेहरा, पोट आणि हातांवर जोडण्यात आली. आतापर्यंत त्याच्यावर 33 हून अधिक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दुर्घटनेत त्याने स्वत:चे दोन्ही कान गमाविले आणि नाकाचा एक हिस्साही हानीग्रस्त झाला.

मानसिक वेदना

या दुर्घटनेने केवळ माझ्या शरीराला नव्हे तर मानसिक आरोग्यालाही मोठे नुकसान पोहोचविले आहे. मी अनेक वर्षांपर्यंत पीटीएसडी म्हणजेच पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डरने ग्रस्त राहिलो. अनेकदा जीवनात हरल्यासारखे वाटले. मी नैराश्यात गेलो, आत्महत्येचाही प्रयत्न केला, परंतु दरवेळी स्वत:ला सावरून परत उभा राहिलो असे डॅरेन सांगतो.

चेहऱ्यावरील शस्त्रक्रियेची प्रतीक्षा

डॅरेन आता चेहऱ्यावर रिकंस्ट्रक्शन सर्जरी करवून घेऊ इच्छितो. यामुळे माझा आत्मविश्वास परतेल आणि मी सामान्य जीवनाच्या नजीक पोहोचू शकेल. याकरता निधी जमविण्याचे अभियान सुरू केले आहे. आतापर्यंत 15 हजार पाउंड जमा झाले आहेत, तर लक्ष्य 1 लाख पाउंडचे असल्याचे डॅरेनने सांगितले आहे. इतके दु:ख अन् संघर्ष झेलल्यावरही डॅरेन हार मानण्यास तयार नाही. मी स्वत:च्या कहाणीद्वारे संकट किंवा अवघड काळाला तोंड देणाऱ्या लोकांना धाडस देऊ इच्छितो. मी स्वत:च्या शत्रूसाठी देखील अशाप्रकारचे जीवन इच्छिणार नाही. जर माझी कहाणी कुठल्याही एका व्यक्तीला हिंमत देऊ शकली तरीही माझ्या दुसऱ्या जीवनाचा उद्देश पूर्ण झाला असे वाटेल असे उद्गार डॅरेनने काढले आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​